संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी : माझ्यामुळे कुणी मंत्री, खासदार,आमदार झालेच तर मला आनंद व अभिमान आहे.तुम्हाला रस्त्यावर उतरवून पदे मिळविण्याएवढी वाईट वेळ माझ्यावर आलेली नाही.कोणी माझ्या नावाचा वापर करून कुणाचा अपमान व बदनामी करत असेल ते सुध्दा मान्य नाही.लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी कार्यकर्त्यावर असे संस्कार कधीच केले नाहीत.पंकजा मुंडे यांचा कार्यकर्ता शांत,संयमी, हुशार, शिस्तबद्ध व संघर्ष करणारा आहे.तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा,संयम बाळगा असे आवाहन करत अत्यंत उत्साही वातावरणात भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मोहटादेवी येथे भाजपा कार्यकर्ते व समर्थकांशी संवाद साधला.
मंगळवार (दि.२१) मोहटादेवी दर्शनासाठी पंकजा मुंडे सकाळी साडेआकरा वाजता पाथर्डी शहरात दाखल झाल्या.यावेळी त्यांच्यासमवेत खासदार डॉ.सुजय विखे,आमदार मोनिका राजळे,माजी आमदार शिवाजी कर्डिले,भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,प्रवीण घुगे आदि बरोबर होते.माळी बाभुळगाव येथे पाथर्डी तालुका भाजपाच्या वतीने पंकजा मुंडे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर,जेष्ठ भाजपा नेते अशोक चोरमले,माजी जि.प.सदस्य राहुल राजळे, माजी सभापती सुनिता दौंड, अजय रक्ताटे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड, डॉ.मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, धनंजय बडे, अमोल गर्जे, संजय बडे, रविंद्र वायकर,विष्णुपंत अकोलकर,काकासाहेब शिंदे,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर,सुनिल ओव्हळ, संजय फुंदे,सुभाष केकाण, जे.बी.वांढेकर, नारायण पालवे, भगवान साठे, संजय किर्तने, बाळासाहेब गोल्हार, वामन किर्तने यांच्यासह पाथर्डी शेवगाव मतदारसंघातील भाजपाचे पदाधिकारी, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी उपस्थित होते.त्यानंतर माजी नगराध्यक्ष आव्हाड यांनी बाबुजी आव्हाड महाविद्यालयाजवळ स्वागत केले. ज्येष्ठ नेते गोकुळ दौंड यांच्या संपर्क कार्यालयाचे व राहुल कारखेले यांच्या कार्यालयाचे उद्घाटन केले.यानंतर शहरातील कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांचे अकोला ग्रामपंचायतीच्या वतीने धायतडकवाडी येथे सरपंच मिरा धायतडक व उपसरपंच जया गर्जे यांनी स्वागत केले.तसेच तालुक्यातील विविध ठिकाणी मुंडे यांचे स्वागत करण्यात आले.मोहटादेवीचे दर्शन घेतल्यानंतर देवस्थान समितीच्या वतीने त्यांचे विश्वस्त डॉ. ज्ञानेश्वर दराडे व मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी व विश्वस्त मंडळाने मोहटादेवीची मुर्ती व साडीचोळी देवुन मुंडे यांचा गौरव केला.त्यानंतर देवस्थानच्या सभागृहात त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी बोलताना मुंडे म्हणाल्या कोणत्याही पदावर नसताना पाथर्डीकरांनी केलेल्या भव्य स्वागतामुळे आपण भारावून गेलो आहोत.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा संघर्षाचा वारसा घेऊन आपण सक्रिय आहोत.आपला संयम एवढा लेचापेचा नाही एका कारणाने (विधानपरिषद ) एवढी डळमळुन जाणार नाही.मात्र राज्यभरातील लोकांच्या मनात जो संताप होता तो पुसून टाकून जे बोलायचे ते स्पष्टपणे बोलून कार्यकर्त्यांची क्षमा मागावी यासाठी एकत्रित भेटलो आहोत.कार्यकर्त्यांना अडचणीत आणून मला काही मिळवायचे नाही.सत्त्व,तत्व,ममत्व ही माझी तत्वे आहेत राजकारण म्हणजे युध्दासारखे आहे जिंकण्यासाठी खेळावे लागले तरी तहाची सुद्धा तयारी ठेवावी लागते.राज्यात सध्या मराठा,ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असून शेतकरी विमा,वीज बिल वसुली अशा ज्वलंत प्रश्नाबाबत कोणी बोलत नाही आगामी काळात राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन या विरुद्ध आवाज उठवून आपण कधी कुणा विरुद्ध शब्द वापरले नाही वैयक्तिक टीका केली नाही पातळी सोडून राजकारण सुद्धा केले नाही सर्वसामान्य जनता हीच शक्ती पदापेक्षा माणसाचे मुंडे म्हणाले.
राज्यातील राजकीय घडामोडी बाबत आपल्याला काही भाष्य करायचे नाही.विधानपरिषदेत निवडून आल्या भाजपाच्या पाचही विजयी उमेदवारांचे मी अभिनंदन केले आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबद्दल केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्याकडे अत्यंत गंभीरतेने मांडू असेही मुंडे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना म्हणाल्या.
विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या निवडक समर्थकांनी राज्यात उद्रेक करत भाजपा मंत्र्याच्या गाडया अडवल्या,कुणी विष प्राशन करून आत्महात्या करण्याचा प्रयत्न करत भाजपा पक्षनेतृत्वाविरूध्द विशेषतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची विरुद्ध अप्रत्यक्षपणे भावना व्यक्त केल्या तरीही याबाबत मात्र काही प्रतिक्रिया व्यक्त न करता पंकजा मुंडे यांनी मौन बाळगले होते.पक्षनेतृत्वाने सुद्धा ठळकपणे या घटनेची नोंद घेतली नाही मात्र मोठा देवीचे दर्शन घेण्याच्या निमित्त करत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे जाहीर केले पंकजाताई काय बोलणार यासाठी राज्याच्या विविध भागातुन निवडक मुंडे समर्थक मोहटादेवी येथे जमले.आज सकाळीच राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडुन अस्थिरता निर्माण झाली या घटनेशी अपडेट होत पंकजा मुंडे यांनी आक्रमक पवित्रा टाळून संयमाची भूमिका घेतली.
Only DM