संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी मॉलमध्ये वाईन विक्री परवानगी दिली आहे,असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी (दि.२८) दुपारी अहमदनगर विश्रामगृह येथे पञकारांशी बोलताना म्हटले.
श्री वळसे पाटील पुढे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री बदलाबाबत मला काहीही माहिती नसून, याबाबतचा निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेतील.
१२ निलंबित आमदारचा निर्णय हा एकट्याचा नसून तो सभागृहाचा असतो, त्या संबंधित सर्वोच्च न्यायालयाची अंमलबजावणी प्रक्रिया पुन्हा राबवून, निलंबित आमदारांना समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही यावेळी श्री वळसे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार संग्रामभैय्या जगताप, माजी आ.दादाभाऊ कळमकर, घनश्याम शेलार यांच्यासह नगर शहरासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.