ओमायक्रॉन संसर्गितांत विषाणूच्या प्रवेशानंतर ताबडतोब अँटिबॉडी तयार !

तुम्हाला ताप/खोकला असल्यास कोरोनाची चाचणी करा
ओमायक्रॉनमुळे अँटिबॉडीज लवकर बनताहेत, रुग्णही वेगाने बरे होताहेत
{खोकल्यासह किंवा विनाखोकला ताप, डोकेदुखी, गळ्यात खवखव श्वास घेण्यात अडचण, अंगदुखी, चव किंवा गंध न येणे, थकवा, अतिसार.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन  नेटवर्क

मुंबई
: कोरोनाचा सर्वाधिक सांसर्गिक ओमायक्रॉन व्हेरिएंट द. आफ्रिकेतून १२७ देशांत पसरला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आफ्रिकेत रोज आढळणारे रुग्ण ५०% पर्यंत घटले आहेत. ही लाट एकाच महिन्यात ओसरली. तेथील शास्त्रज्ञांनी नवे संशोधन केले असून ते ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाले. त्याचे निष्कर्ष आशा पल्लवित करणारे आहेत. ओमायक्रॉन संसर्गितांत विषाणूच्या प्रवेशानंतर ताबडतोब अँटिबॉडी तयार होऊ लागतात. त्या गंभीर आजारी पडू देत नाहीत. याच कारणामुळे केवळ १% लोकांनाच विशेष औषधीची गरज भासली. संशोधनावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातील कम्युनिटी मेडिसिनचे विभागप्रमुख प्रा. जुगलकिशोर म्हणाले, ‘चांगली गोष्ट म्हणजे ओमायक्रॉननंतर टी सेल्समध्ये अँटिबॉडीज बनत आहे. परंतु आपण निष्काळजीपणाने वागू नये.
देशात ओमायक्रॉनने दुसरा मृत्यू, रुग्णही वाढले कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असतानाच शुक्रवारी रात्री देशभरात नवे वर्ष सुरू झाले आणि तेही निर्बंधांतच. अनेक राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी जल्लोष करण्यास बंदी घातली. त्यामुळे लोकांना घरीच नववर्षाचे स्वागत करावे लागले. महाराष्ट्राने नवे दिशानिर्देश लागू केले. यानंतर राज्यात बंद किंवा मोकळ्या जागेत ५० पेक्षा जास्त लोक जमण्यास मनाई करण्यात आली. मुंबई पोलिसांनी शुक्रवारपासून १५ जानेवारीपर्यंत सायंकाळी ५ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कलम १४४ लागू केले. याद्वारे बीचवर जाणे, मैदान, पार्कवर जाण्यास बंदी केली. केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितले की, २४ तासांत कोरोनाचे १६,७६४ नवे रुग्ण आढळले. तसेच ओमायक्रॉनचे रुग्ण वाढून १३१९ झाले आहेत. देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे दुसरा मृत्यू झाला. राजस्थानातील उदयपूर येथील ७३ वर्षीय वृद्ध हायपरटेन्शन आणि मधुमेहाने पीडित होते. २१ रोजी त्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला होता. परंतु २५ रोजी ओमायक्रॉनने बाधित आढळले. चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. दिनेश खराडी यांनी सांगितले की, या वृद्धाचा मृत्यू शुक्रवारी झाला आहे.
आजपासून १५ ते १८ वर्षांचे युवक लसीसाठी शनिवारपासून नोंदणी करू शकतील. कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन आणि स्लॉट बुक केल्यानंतर लस घेऊ शकतील. या वयोगटाचे लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू होईल.
ओमायक्रॉनची रुग्णसंख्या दिवसाला दीडपट वाढतेय.आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, नवीन विषाणूचा रुग्णदर दिवसाला दीड पटीने वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्वेक्षणात वाढ केली आहे. विविध प्रयोगशाळांत चाचण्यांचे अहवाल तात्काळ दिले जात आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाणही वाढवले असून ओमायक्रॉनच्या रुग्णांना स्वतंत्र विभागात ठेवण्यात येत आहे.
राज्यात नवीन रुग्णांमध्ये ५०% वाढ, आकडा ८,०६७ महाराष्ट्रात गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कोरोनाचे नवे रुग्ण जवळपास ५०% वाढले. राज्यात ८,०६८ नवे रुग्ण, तर ८ मृत्यू नोंदवण्यात आले. मुंबईत ५,४२८ नवे रुग्ण सापडले. २०२१ च्या शेवटच्या दिवशी राज्यातील एकूण रुग्णसंख्या ६६ लाख ७८,८२१ तर बळींचा आकडा १ लाख ४१,५२६ झाला. शुक्रवारी मुंबई क्षेत्रात ओमायक्रॉनचे ४ रुग्ण सापडल्याने एकूण संख्या ४५४ वर गेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!