संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
Mumbai – अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चांगलीच चर्चेत आहे. सोनालीचे बॅक टू बॅक दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि सिनेमांनी थिएटरमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला. सोनालीचा झिम्मा आणि पांडू हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. पांडू या सिनेमात उषा या पात्रातून सोनालीचा वेगळा लुक प्रेक्षकांना पहायला मिळाला. पांडू सिनेमातील उषा प्रेक्षकांना फारच भावली. सोनालीने पांडू सिनेमातील उषा आणि पांडू यांच्या लग्नातील उषाच्या नवरीच्या लुकमधील काही फोटो शेअर केले आहे. सोनालीच्या या फोटोंवर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.