भाजपवाले हे सकाळी नाष्टा करून आले आणि दुपारी जेवण करायाला घरी निघून गेले : ना.तनपुरे

👉उपोषण करायचं, निदान लोकभावनेचा आदर करून तरी भाजपने उपोषण करायला हवं होतं’
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क / व्हिडिओ
अहमदनगर.:
भाजपवाले हे सकाळी नाष्टा करून आले आणि दुपारी जेवण करायाला घरी निघून गेले. उपोषण करायचं, निदान लोकभावनेचा आदर करून तरी भाजपने उपोषण करायला हवं होतं’ भाजपने आंदोलनाचा फार्स बंद करावा, आदल्या दिवशी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले आणि दुसऱ्या दिवशी भाजपच्या वतीने उपोषण केले आहे, अशी खिल्ली भाजपाच्या आंदोलनाची ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उडवली.

मंत्री तनपुरे पुढे म्हणाले, आम्हाला शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची जाणीव आहे. परंतु, भाजपने नाटकी आंदोलन करणं थांबवले पाहिजे, असा टोलाही त्यांनी विशेषतः माजीमंञी शिवाजी कर्डीले यांचा नामोल्लख टाळत लगावला.
काही लोकांना निवांत झोप येण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये गेले आणि असेच लोक आता इतरांच्या बॅलन्स शीटबाबत बोलत आहेत, अशा शब्दात नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी पालक मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिला आहे.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नगर तालुक्‍यातील विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, यानंतर ते पञकारांशी बोलत होते.
भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, या मागणीसाठी उपोषण करण्यात आले होते. याप्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत, यावरून त्यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं होतं की, “पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सध्या त्यांचे बॅलन्स शीट तपासण्यात व्यस्त आहेत, त्यांना ते तपासू द्यात. त्यानंतर ते जिल्ह्यात येतील,’ अशी टीका खासदार विखे यांनी केली होती. या टिकेला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ” पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे काम अत्यंत चांगले असून त्यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे.
केंद्रामध्ये भाजपचे सरकार आहे. खासदार विखेंनी केंद्र शासनाकडून निधी आणून दाखवा. केंद्र सरकार गुजरात राज्याला वादळाच्या नुकसानीच्या वेळेस भरपाईसाठी निधी देत आहे. परंतु, महाराष्ट्राला निधी देत नाहीत. नगर-मनमाड महामार्गाला निधीची गरज आहे. डॉ. विखे यांनी या महामार्गाला निधी आणून काम करून दाखवावे, असे आव्हान तनपुरे यांनी दिले.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अभ्यास करून बोलावं.
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी “राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवून कोळसा पुरवठा थांबविण्याची विनंती केली होती’ या वक्तव्याबाबत बोलताना हे चुकीचे आहे. राज्य सरकारने अशी विनंती केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोबतच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अभ्यास करून बोलावे, असा सल्ला राज्यमंत्री तनपुरे यांनी दिला.
केंद्राकडून महावितरणच्या खासगीकरणाचा डाव
केंद्र सरकारकडून महावितरणचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे, मात्र असे झाले तर शेतकरी आणि सर्वसामान्यांकडून वीज बिल वसुली ‘पठणी’ पध्दतीने केली जाईल. सध्या महावितरणकडून कोठेही ‘पठाणी’ वीज बिल वसुली केली जात नाही. कोणालाही सक्ती केली जात नाही. मात्र, जर महावितरणचे खासगीकरण झाले तर सर्वात जास्त नुकसान हे सर्वसामान्यांचेच होईल. त्यामुळे महावितरणचे काम अतिशय उत्तम सुरू आहे. नागरिकांनी देखील वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
👉जिल्हाधिकाऱ्यांचे नियमानुसार लॉकडाऊन
जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन केल्याबाबत खासदार विखे यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला होता. जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देण्यात आलेल्या अधिकारांनुसार त्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. यात कोणतेही राजकारण केले नसल्याचा निर्वाळा ना.श्री तनपुरे यांनी दिला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!