संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- तालुक्यातील खरवंडी कासार येथे जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकून ९ जुगा-यांवर कारवाई केली आहे. या छाप्यामध्ये १ लाख ९८ हजार किं. चा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. संजय बापु शेकडे (रा. भारजवाडी, ता. पाथर्डी), हनुमंत अशोक गोल्हार ( रा. जवळवाडी, ता. पाथर्डी), बाबासाहेब जनार्दन कराड (रा. भारजवाडी, ता. पाथर्डी), संतोष नवनाथ बांगर ( रा. भारजवाडी, ता. पाथर्डी), देविदास वामन कराड (रा. भारजवाडी, ता. पाथर्डी), अंबादास पंडीत बटुळे ( रा. भारजवाडी, ता. पाथर्डी), अंबादास वामन कराड (रा. भारजवाडी, ता. पाथर्डी), मारुती हरीभाऊ बटुळे (रा. भारजवाडी, ता. पाथर्डी), राजेंद्र महादेव दराडे (रा. मालेवाडी, ता. पाथर्डी) आदिंजण गुन्हे दाखल करण्यात आल्याची नावे आहेत.
नाशिक परिक्षेत्र उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर व जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे शेवगांव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई सोपान गोरे, सफौ मनोहर शेजवळ, पोकॉ राहुल सोळुंके, शिवाजी ढाकणे, जांलिदर माने, आकाश काळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
दि. १२ ऑक्टोबरला पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये फरार असणारे आरोपींचा शोध घेत असतांना पोनि अनिल कटके यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली. खरवंडी कासार गावात, बाजार तळा जवळ, पत्र्याचे शेडचे आडोश्याला काही लोक पत्त्याचा जुगार खेळत आहेत. अशी माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन मिळालेल्या माहितीची खात्री केली, यानंतर छापा टाकला असता त्या ठिकाणीवरून ९ जणांना पकडण्यात आले. त्या सर्वांच्या कब्जातून रोख रक्कम, मोबाईल, मोटार सायकल व जुगाराची साधने असा एकूण १ लाख ९८ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. तो जप्त करून आरोपींविरुध्द पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. ७६९/२०२९ म.जु.का.क. १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई पाथर्डी पोलीस करीत आहे.