राज्यात गोहत्या बंदी कायदा असूनही नगर जिल्ह्यातील गोहत्या व तस्करी प्रकरणी कारवाई नाही : विश्व हिंदु परिषद


👉: संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षकांकडून या प्रकरणी हलगर्जीपणा झाल्याबाबत खातेनिहाय चौकशी व्हावी :  विश्व हिंदू परिषदेची मागणी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर –
दि.3 ऑक्टोंबर 2021 रोजी जिल्ह्यातील पोलिस दलाला मान खाली घालायला लावणारी व कर्तव्यात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करीत असल्याची अक्षम्य घटना राज्याचे महसूल मंत्री ना.थोरात यांचे राजकीय प्राबल्य असलेल्या संगमनेर तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात गोमांस साठा नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उघड होऊन जप्त करण्यात आला.तसेच संगमनेर तालुका हा मुंबई,ठाणे, पुणे इत्यादी शहरात व गोमांस पुरवण्याचे आगार असल्याचे आता लपून राहिलेले नाही. महाराष्ट्र राज्यात गोहत्या बंदी कायदा असून देखील उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलीस निरीक्षक हे जाणीवपूर्वक सर्वज्ञात असलेल्या कारणास्तव या प्रकरणाकडे अनेक महिन्यापासून डोळेझाक करीत असल्याचे देखील उघड झाले आहे.म्हणून या पोलिस अधिकाऱ्यांची याबाबत खातेनिहाय चौकशी करण्यात यावी.अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्मप्रसार प्रमुख डाॅ.मिलिंद मोभारकर यांनी केली. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे कोषाध्यक्ष मुकुल गंधे,जिल्हा सहमंत्री गौतम कराळे, निलेश चिपाडे आदी उपस्थित होते.                     

याप्रकरणी चौकशी करुन पोलिस अधिकाऱ्यांवर देखील वचक निर्माण होईल अशी कारवाई होणे गरजेचे वाटते व अशी आम्ही मागणी करीत आहोत.असेच प्रकार नगर शहर, जामखेड, श्रीरामपूर, शेवगाव, कोपरगाव येथे देखील सर्रासपणे चालू असून गोहत्या व गोमांसतस्करी राजरोसपणे अव्याहतपणे सुरू आहेत.व या ठिकाणच्या पोलिस अधिकाऱ्यांकडून देखील अर्थपूर्ण पद्धतीने डोळेझाक होत असल्याचे नागरिकाचे उघड उघड चर्चा आहे. यासंबंधी गांभीर्याने दखल घेऊन हे सर्व प्रकार बंद होण्याच्या अनुषंगाने तातडीची योग्य ती कार्यवाही एक महिन्यात करावी अशी विनंती करीत आहोत. याबाबत हिंदू समाजाच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या आहेत. याची नोंद घ्यावी अन्यथा हिंदू समाज या विरोधात रस्त्यावर उतरेल.असे विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत धर्मप्रसार प्रमुख मिलिंद मोभारकर यांनी सांगितले.          
संकलन: अमोल भांबरकर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!