संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये रात्री साडे आठ वाजेपर्यंतच येथील सर्व दुकाने, आस्थापने सुरू राहतील. त्यानंतर ते बंद राहतील.अन्यथा अशांवर दंडात्मक कारवाई होईल . शिर्डीतील ग्रामस्थ, दुकानदार साईभक्त यांनी कोरोणा च्या अटी व शर्ती पाळाव्यात असे आवाहनही अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्री साईमंदिर, श्री शनी शिंगणापूर मंदिर ,श्री मोहटा देवी मंदिर तसेच इतर देवस्थाने असून दि.७ सप्टेंबरला राज्य शासनाच्या आदेशान्वये ते भक्तांसाठी खुली करण्यात येणार आहेत. त्यामुळे या देवस्थानची नियोजन आढावा बैठक घेण्यात येत असून त्यानुसार शिर्डी येथे मंगळवार रोजी श्री साईबाबा संस्थान कार्यालयात पदाधिकारी अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी राजेंद्र शिरसागर, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बनायात व इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते. ही बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी शिर्डीत पत्रकार परिषद घेतली यावेळी ते पुढे म्हणाले की, दि.७ ऑक्टोबरला जिल्ह्यातील सर्व मंदिरे भक्तांसाठी खुली होणार आहे. शिर्डीचे श्री साई मंदिर हे भक्तांसाठी खुली होणार असून तसे हमीपत्र जिल्हा प्रशासनाला संस्थांननी देणे गरजेचे होते व त्यांनी तसे ते तीन दिवसांपूर्वीच हमीपत्र दिले आहे. त्याप्रमाणे संस्थान भक्तांच्या मंदिर प्रवेशासाठी अटी व नियम करून नियोजन करून मंदिर सुरू करणार आहे. मात्र साई संस्थान ने पंधरा हजार भाविकांना ऑनलाईन दर्शन पास घेऊनच दर्शन साठी मंदिरात सोडावे. असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिर्डीत आता ऑफलाईन दर्शन पास राहणार नाही. तर ऑनलाईन दर्शन पास राहणार आहेत. तसेच भक्तांना पूजा साहित्य घेऊन जाता येणार नाही. असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले आहे. जिल्हा प्रशासन व साईबाबा संस्थान यांच्यामध्ये समन्वय आहे का ?असे विचारताच चांगला समन्वय आहे, आपण शंका-कुशंका घेऊ नये असे सांगत साई संस्थान प्रशासनाची पत्रकार परिषद अगोदर झाली व जिल्हाधिकार्यांची त्यानंतर लगेच झाली ,वेगवेगळ्या दोन परिषदा झाल्यामुळे त्यांना समन्वय संदर्भात विचारले असता त्यांनी पुढे म्हटले की, संस्थान चे नियोजन त्यांनी सांगितले. नियमानुसार अटी व शर्ती संदर्भातले नियमावली चे हमीपत्र त्यांनी तीन दिवस अगोदर जिल्हा प्रशासनाकडे दिले आहे. मात्र त्यात काही बदल जिल्हा प्रशासनाने सुचवले व त्यांनी ते सकारात्मक मान्य केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व संस्थान प्रशासनात चांगला समन्वय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच साईबाबा संस्थान चे प्रसादालय हे मात्र भक्तांसाठी बंद राहणार असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच शिर्डीत रात्री साडेआठ वाजेपर्यंत दुकाने असता पणे सुरु ठेवण्यात येतील त्यासाठी शिर्डी नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांना ही सूचना देण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.व भक्तांनी कोरोणाच्या अटी व शर्ती काटेकोरपणे पाळाव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे राहतेचे तहसीलदार कुंदन हिरे आदींसह अधिकारी उपस्थित होते.
संकलन : राजेंद्र गडकरी