संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- इनरव्हिल क्लब ऑफ अहमदनगर, व्हिनस व केअर प्लस हॉस्पीटल यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा कारागृहातील महिला अधिकारी, कर्मचारी व कर्मचा-यांच्या कुटूंबातील महिला सदस्य यांच्यासाठी मेडीकल कॅम्प पार पडला.
अहमदनगर जिल्हा कारागृह प्रशासनाने नेहमीच कारागृहातील बंद्यांसाठी विविध आरोग्य कॅम्प, नेत्र तपासणी शिबीर, धार्मीक सण, मनोरंजनात्मक कार्यक्रम सुधारणात्मक कार्यक्रम, न्यायालयाच्या माध्यमातून कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर असे अनेक उपक्रम आयोजीत करून बंदयांचे आरोग्य, ज्ञान व कायदेविषयक जनजागृतीकडे लक्ष दिले आहे.
परंतू, बंदयांच्या आरोग्याची काळजी घेताना अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी इनरव्हिल क्लब ऑफ अहमदनगर व केअर प्लस सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, अहमदनगर यांच्या माध्यमातून जिल्हा कारागृहाच्या महिला अधिकारी, कर्मचारी व कुटूंबीय अशा एकूण ३५ हून अधिक महिलांचे आजार, ब्लड चेकअप, ब्लड ग्लुकोज लेवल चेकअप, ईसीजी, बिपी, शुगर, ब्रेस्ट कॅन्सर, गर्भपिशवी कॅन्सर, कॉन्सलींग अशा अनेक आजारांचे निदान व उपचार करण्यात आले.
महिलांसाठी खास मेडीकल कॅम्प आयोजीत करण्यासाठी संकल्पना कारागृह प्रशासनाने उभी करून कारागृह विभागाच्या पुणे पश्चिम विभागाचे डी. आय. जी. योगेश देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मेडीकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
महिलांसाठीच्या विशेष मेडीकल कॅम्पसाठी इनरव्हिल क्लबच्या सौ. प्रगती गांधी, प्रेसीडंट, डॉ. प्राजक्ता पारधे, केअर प्लस हॉस्पीटल, डॉ. किर्ती सोलट, सखी हॉस्पीटल, श्रीलता आडेप, कॉन्सेलर सारीका मुथा, अपता शिंगवी, व्हाईस प्रेसीडंट, डॉ. अंकिता दिघे, भाविका चांद, डॉ. सचिन सोलट व लॅब टेक्निशीअन इत्यादींनी मोलाचे सहकार्य करून मेडीकल कॅम्प यशस्वी पार पाडला.
मेडीलक कॅम्पचे आयोजन कारागृहाचे अधीक्षक शामकांत शेडगे यांनी केले. कॅम्पसाठी जेलर श्रीमती सुवर्ण शिंदे, जेलर देवका बेडवाल, फार्मसी अधिकारी क्रांती सोनमाळी, मेडीकल स्टाफ व कर्मचारी वृंद हजर होते.