संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार हातात तलवार घेऊन परिसरात दहशत करणा-या आरोपीला हत्यारासह पकडण्याची कोतवाली पोलीसांनी कामगिरी केली आहे. दिपक सुरेश बे-हाडे (वय २३, रा- सारसनगर मार्केटयार्ड त्रिमूर्ती चौक ) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर उपविभागीय प्रभारी पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि संपत शिंदे यांच्या सूचनेनुसार पोसई जी टी इंगळे, पोना विष्णु भागवत, पोना अभय कदम, पोना नितीन गाडगे, पोकाॅ प्रमोद लहारे, पोकाॅ सुमीत गवळी, पोकॉ दिपक रोहकले, पोकॉ सुशील वाघेला आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि.२ ऑक्टोबरला रात्री ११.३० ते दि.३ ऑक्टोबर रोजी १ वाजे दरम्यान कोतवाली पोलीस ठाणे हाद्दीमध्ये कॉबीग ऑपरेशन चालू असतांना पोनि संपत शिंदे यांना माहिती मिळाली. अहमदनगर शहरात मार्केट यार्ड भागता महात्मा फुले चौकात एकजण हा त्याचे हातात तलवार धरून नागरिकांवर दहशत करीत आहे. तेथील नागरीक घाबरून गेले आहेत अशी, अशी माहिती मिळाली. या माहितीनुसार श्री पोनि शिंदे यांनी पोलिस पथकाला सूचना दिल्या. पथकाने मार्केटयार्ड भागात जाऊन त्याला दोनपंचा समक्ष
त्याचे हातातील तलवारीसह त्याला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडे नाव, गावा विचारल्यावर दिपक सुरेश बे-हाडे असे त्याने सांगितले. त्याला तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्यात पकडून आणून त्याचे विरुद्ध गुरनं ७२८/२०२१ आर्म अॅक्ट ४.२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुध्द कोतवाली व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.