संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई – राज्यात मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे पीक आणि शेतजमीनी खराब झाल्या आहेत. मराठवाडा आणि विदर्भात जलयुक्त शिवार योजनेमुळे पुर आला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. या आरोपांवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्राची जनता अनाथ झाली की काय? असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच जलयुक्तमधील सर्वच कामे चुकीची झाली असतील असे म्हणता येणार नाही. जलयुक्त योजना ही सकारात्मक होती अशी प्रतिक्रया पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानीचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आढावा घेतला आहे. यावेळी पंकजा मुंडेंनी खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, जलयुक्त योजनेतील सगळीच कामे चुकीची झाली असतील असे नाही त्यातील काही कामे झाली असतील. जलयुक्त योजना ही लोकउपयोगी आणि सकारात्मक योजना होती. मराठवाडा विदर्भातील जलयुक्त योजनेत निर्माण करण्यात आलेल्या पात्राच्या बाहेर पाणी आलं आहे. काही ठिकाणी पाणी स्वतःचे पात्र सोडून तीन किलोमीटरपर्यंत पसरलं असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
जलयुक्त योजनेत पाण्याचा मुख्य प्रवाह बदलला असल्यामुळे मराठवाड्यात पुरस्थिती निर्माण झाली होती. यावर पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे की, जलयुक्त योजनेत नैसर्गिक प्रवाह बदलण्याची कुठेही परवानगी नाही. ज्या नद्या आहेत त्याचे खोलीकरण करणे, बंधारा बांधण्याची तरतूद करण्यात आली आहे. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याची कोणत्याही योजनेत परवानगी देण्यात आली नाही असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.
सध्याची परिस्थितीमध्ये राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे. केंद्र सरकारनेत किती मदत करायची, राज्य सरकराने किती मदत करायची म्हणजे महाराष्ट्राची जनता आता
महाराष्ट्राची जनता अनाथ झाली का काय? त्यांचे कोणीच वाली नाही का? प्रत्येक जण एकमेकांवर आरोप करत आहेत. एकमेकांवर आरोप करुन विषय टाळणे हे सरकारचे काम नाही जनतेच्या पाठीशी उभं राहणे हे सरकारचे काम असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.