संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
हमालमापाडी यांना त्यांचे हक्क मिळावे, त्यांचे जीवनमान सुधारावे, हमालांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला, त्यांच्यासाठीच्या योजनांचे लाभ मिळावा, हमाल आणि व्यापारी यांच्यात समन्वय साधून प्रत्येकाची उन्नत्ती व्हावी, यासाठी हमाल पंचायत काम करत आहे. हमालही आपल्या मेहनतीने बाजारपेठेच्या उन्नत्तीत योगदान देत असतो. असेच काम गेल्या 40 वर्षांपासून रावसाहेब दराडे यांनी करुन प्रामाणिक सेवा दिली. हमाली काम करतांना त्यांनी संघटनेच्या कामातही योगदान देऊन हमालमापाड्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलनात सहभाग दिला. त्यांचा कार्याचा गौरव हा हमालांना प्रेरणादायी आहे. निवृत्ती नंतरही ते संघटनेच्या कार्यात आपले योगदान देतील, असा विश्वास हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.
अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीचे हमाल कार्यकर्ते रावसाहेब दराडे यांचा सेवानिवृत्तीबद्दल त्यांचा सत्कार करतांना जिल्हाध्यक्ष अविनाश घुले. याप्रसंगी गोविंद सांगळे, शेख रज्जाक शेख लाल, सचिव मधुकर केकाण, सल्लागार अशोकराव बाबर, बाळासाहेब वडागळे, नारायण गिते, भैरु कोतकर, बबन अजबे, अनुरथ कदम, सुनिल गिते, रत्नाबाई आजबे आदि उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देतांना रावसाहेब दराडे म्हणाले, हमाली ही एक प्रकारची नोकरी असून, ती तुम्ही प्रामाणिकपणे केली पाहिजे. कोणतेही काम हलके न मानता ते प्रामाणिक केल्यास त्यासही प्रतिष्ठा मिळत असते. हमाल पंचायत नेहमीच हमाल-मापाडी यांच्या पाठशी उभी राहिली आहे. संघटनेच्या माध्यमातून हमालांचे अनेक प्रश्न सुटून त्यांना त्यांचे हक्कम व मानाचे स्थान मिळवून दिले आहे. आज सेवानिवृत्त होत असलो तरी आपली नाळ हमालांशी जुळलेली असल्याने संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभागी देऊ, असे सांगितले.यावेळी रविंद्र भोसले, रामा पानसंबळ, नवनाथ बडे, राहुल घोडेस्वार, मच्छिंद दहिफळे, गणेश बोरुडे, सुनिल गर्जे, विष्णू ढाकणे, तबाजी कार्ले, अर्जुन शिंदे आदि उपस्थित होते