भाजपच्या युवा वॉरियर्स अभियानाची शिर्डीतून जोरदार प्रतिसाद

👉चंद्रशेखर बावनकुळेचें शिर्डीत जोरदार स्वागत
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

शिर्डी – भाजप युवा मोर्च्याच्या युवा वरियर्स अभियानाची सुरवात राज्यभरात जोरदार सुरवात झाली आहे. नगर जिल्ह्यात देखील युवा वरियर्स अभियानाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी शाखांचे उदघाटन भाजप युवा मोर्च्याचे प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असल्याने रात्री उशिरा ते शिर्डीत दाखल झाले. त्यांचे शिर्डीत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांसह शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व युवा मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे उपस्थित होते.
रात्री उशीर झाला असतानाही शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थितीत होते. या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातून 25 लाख युवक कार्यकर्त्यांना जोडले जाणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे यांनी दिली. तसेच या युवकांच्या माध्यमातून विविध योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले
नव नवीन युवकांना पक्ष संघटनेत सक्रिय करणेकामी ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत भाजयुमोच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील विविध क्षेत्रात आवड असणार्‍या युवांना जोडून त्यांच्यासाठी त्यांना रुची असणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तरुणाईला जोडणारा हा ‘युवा वॉरीयर्स’ उपक्रम आहे. युवक ही भारताची शक्ती आहे. या शक्तीचा सदुपयोग करून देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.सशक्त भारताच्या निर्माणासाठी युवांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. या युवाशक्तीला दिशा देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केल्यास त्याचा उपयोग आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी होऊ शकतो. अशा विविध क्षेत्रातील युवांनी या लोकशाहीच्या प्रक्रियेचा भाग व्हावे आणि देशाची लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे या हेतूने भाजयुमोतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सशक्त भारताच्या निर्माणासाठी युवकांचे योगदान फारच महत्वाचे आहे. आपल्या देशातील युवा हा फार प्रगल्भ आहे. त्यामुळे, प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केल्यास त्याचा उपयोग आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी होऊ शकतो. अशा विविध क्षेत्रातील युवांचा लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभाग घडवून देशाची लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे, या हेतूने भाजप युवा मोर्चाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितले. यावेळी आकाश त्रिपाठी, बबलू वर्पे, अरुण हजारे,शिवम अग्रवाल, स्वप्नील गोंदकर, लखन जव्हेरी,आकाश वाडेकर किरण परदेशी, दत्तू झाकणे, मोहन क्षत्रिय, पुष्पक खापटे, लखन जव्हेरी, प्रथमेश सजन हे उपस्थितीत होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!