आमिर व किरण यांच्या नात्याला २००१ मध्ये “लगान’च्या सेटवर ; अखेर १५ वर्षानंतर बाजूला !

👉आमिर खान-किरण राव यांनी संयुक्त निवेदनातून दिली घटस्फोटाची माहिती
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

“लगान’च्या चित्रीकरणावेळी सुरू झालेल्या आमिर खान व किरण राव यांच्या प्रेमकथे ही तब्बल १५ वर्षानंतर  संपुष्टात आली.  शनिवारी सकाळी त्यांच्या घटस्फोटाची बातमी आली. दोघांनी संयुक्त निवेदन काढत संमतीने वेगळे होण्याची माहिती देत सांगितले, आता आम्ही आयुष्यात नवा अध्याय सुरू करत आहोत. पती-पत्नी म्हणून नव्हे, तर मुलाचे आई-वडील आणि कुटुंबाच्या रूपाने. दोघांना १० वर्षांचा मुलगा आहे. आमिर आणि किरण यांच्या नात्याला २००१ मध्ये “लगान’च्या सेटवरून सुरुवात झाली होती.
किरण चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची सहायक होती. आमिरने सांगितले होते की, एका फोन कॉलवरून त्याचे किरणशी बोलणे सुरू झाले. सुमारे तीन वर्षांच्या भेटीगाठीनंतर डिसेंबर २००५ मध्ये आमिरने त्याच्यापेक्षा ९ वर्षे लहान किरणसोबत लग्न केले. दोघांनी २०११ मध्ये सरोगसीद्वारे मुलगा आझाद रावला जन्म दिला. ५६ वर्षांच्या आमिर खानचा हा दुसरा घटस्फोट. त्याचे पहिले लग्न १९८६ मध्ये बालपणची मैत्रीण रीना दत्तासोबत झाले होते. २००२ पर्यंत ते टिकले. नंतर दोघांचा घटस्फोट झाला. पहिल्या पत्नीपासून दोन मुले – इरा व जुनैद आहेत.
‘लगान’ व ‘मंगल पांडे’त आमिरसोबत काम केलेल्या अमीन हाजीने सांगितले, दोघांमध्ये या लॉकडाऊनदरम्यान अडचणी सुरू झाल्या. जानेवारी-फेब्रुवारीत मला पहिल्यांदा त्याची माहिती झाली. मी दोघांशी बोललो. मात्र जमत नसल्याचे पाहून दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता जे झाले ते सर्वांच्या समोर आहे आणि तेच वास्तव आहे.

तुम्हीही 👉घटस्फोटाकडे नव्या प्रवासाची सुरुवात
माहिती देताना आमिर-किरणने लिहिले, १५ वर्षे आम्ही जीवनातील अनुभव, आनंद व हसणे वाटून घेतले. नात्यात विश्वास, सन्मान व प्रेम वाढले. आम्ही काही काळापूर्वी वेगळे होण्याची सुरुवात केली व आता औपचारिक रूप देत आहोत. मुलगा आझादसाठी समर्पित आई-वडील आहोत. त्याचे संगोपन एकत्र करू. चित्रपट, पाणी फाउंडेशन व इतर प्रकल्पांतही सोबत राहू. तुम्ही या घटस्फोटाला नव्या प्रवासाची सुरुवात म्हणून बघाल ही अपेक्षा.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!