मिरजगाव जुगार अड्ड्यावर वर कर्जत पोलिसांचा छापा ; 20 आरोपींना अटक

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

कर्जत- मिरजगाव शिवारात जुगार अड्ड्यावर कर्जत पोलिसांनी छापा टाकून 20 जणांना अटक केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि 3 जुलै 2021 रोजी 2.20 वा.चे सुमारास मिरजगाव गावचे शिवारात कडा रोडलगत रोडचे बाजूला पत्र्याचे शेडचे बाजूला कर्जत (जि. अहमदनगर) येथे यातील गोलाकार बसून तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळतांना व खेळविताना मिळून आले. आरोपींकडून 48 हजार 20 रु रोख रक्कम व 1000 रु. किंमतीचे जुगाराचे तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळण्यासाठी लागणारे जुगाराचे साधने असा 49 हजार 20 रु. किंमतीचा मुद्देमाल सह मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला. क्लब मालक स्वप्निल संभाजी कु-हाडे हा याच्यासह 21 आरोपींवर पो.कॉ सुनिल दिलीप खैरे यांचे फिर्यादी वरून कर्जत पोलिस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोटीराम दत्तात्रय अजबे (वय 30 रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड), शिवाजी भिमराव धोत्रे (वय 34, रा.शिराळ ता. आष्टी जि.बीड ), सुनिल विष्णु इंगळे (वय 48, रा. मिरजगाव ता.कर्जत जि.अ.नगर), अशोक नामदेव जाधव (वय 33, रा.घुमरी ता.कर्जत जि.अ.नगर), कैलास भाउसाहेब तनपुरे (वय 44 रा. मिरजगाव ता. कर्जत जि.अ.नगर), विलास दगडु अजबे (वय 43, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड), बालाजी प्रभु कुदाले (वय 48, रा. मिरजगाव ता. कर्जत जि.अ.नगर), राजेंद्र हिरालाल शेळके (वय 48, रा. लिंमगाव चोभा ता.आष्टी जि.बीड़), चंद्रकांत खुशाबा चांडे (वय 30, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड ), मच्छिंद्र पांडुरंग दुधावडे (वय 44 रा.लिंमगाव चोभा ता.आष्टी जि.बीड़), नवनाथ लक्ष्मण लष्करे (वय 32, रा. बहिरोबावाडी ता.कर्जत जि.अ.नगर), बाळु पांडुरंग पवार (वय 32, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड), कचरु दगडु आजबे (वय 48, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड), रेवनाथ भिमराव सरपते (वय 42, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड), महंमद युनूस शेख (वय 36, रा. मुर्शदपुर ता.आष्टी जि.बीड), संभाजी शिवाजी कु-हाडे (वय 49 रा. मिरजगाव ता.कर्जत जि.अ.नगर), हनुमंत सिताराम बुधीवंत (वय 33 रा.शिराळ ता.आष्टी जि. बीड), मच्छिंद्र धोंडीबा कर्डीले (वय 52 रा. कडा ता.आष्टी जि.बीड ), रतन बबन नलवडे (वय 57, रा. हिंगणे ता.आष्टी जि.बीड), राजेंद्र हिरालाल घोडके (वय 50, रा. मिरजगाव ता.कर्जत जि.अ.नगर) आदिंनी पकडण्यात आले असून, स्वप्निल संभाजी कु-हाडे ( रा.मिरजगाव ता. कर्जत हा फरार आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,
उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पो. नि. चंद्रशेखर यादव , सपोनि सुरेश माने, पोउपनि अमरजित मोरे, पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव , सुनिल खैरे, सचिन वारे, गोवर्धन कदम, बबन दहिफळे, ईश्वर माने, गणेश काळाने आदिंच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास बबन दहिफळे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!