संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत आजकाल सतत चर्चेत असते. तिच्या बेताल वक्तव्यामुळे सतत सोशल मीडियावर ट्रोल होत असते. राखी बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर तिने अनेक नवीन प्रोजेक्ट साईन केले आहेत. ‘ड्रीम मे एंट्की हिट हो गया’ हे राखीचे गाणे देखील सध्या प्रचंड हिट होत आहे. राखीने आजवर अनेक बोल्ड भूमिका केल्यात. अनेकदा त्यावरून तिला ट्रोल करण्यात आलेय. मात्र आता राखीला आईची भूमिका करायची आहे. राखीला आईच्या भूमिकेत पहायचे म्हणजे प्रेक्षकांसाठी हा मोठा धक्का असेल. त्यामुळे राखीच्या एका नव्या वक्तव्यामुळे राखी पुन्हा एकदा ट्रोल झालीय. राखीने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे. मला पुढील फिल्ममध्ये तैमूरच्या आईची भूमिका करायला फार आवडेल. मला आता स्टारकिड्सच्या आईची भूमिका साकारायची आहे असे राखीने म्हटले आहे.
राखीच्या मुलाखतीत रॅपिड राउंड खेळ घेतला होता त्यात तिला अनेक मजेशीर प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा राखी म्हणाली तैमूर खूप क्यूट आहे. तो सुपरस्टार होईल. तैमूर मोठा झाल्यावर मला त्याच्या आईची भूमिका करायची आहे.पुढे राखी म्हणाली भविष्यात माझी भूमिका कोणी साकारली ती इतकी कठीण नाहीये. कारण मी एक स्ट्रगलिंक अभिनेत्री आहे. विद्या बालन, आलिया भट्ट, करिना कपूर खान,प्रियांका चोप्रा या अभिनेत्री माझी भूमिका साकारू शकतात. या अभिनेत्री खूप टॅलेंटेड आहेत. राखीच्या या उत्तरानंतर सगळ्यांचीच झोप उडाली. राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून सतत मीडियाच्या चर्चेत येत असत. बिग बॉसमध्ये असताना देखील राखीने केलेल्या अनेक खुलास्यांमुळे राखीची चांगलीच चर्चा रंगली होती.