मराठी टेलिव्हिजनवरील ‘देवमाणूस’ ही मालिका सध्या प्रचंड गाजत आहे. अल्पावधीतच या मालिकेने सर्व पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. यातच नवनव्या पात्रांच्या एंट्रीमुळे मालिका आता रंजक वळणार पोहचली आहे. अशातच मालिकेतील एसीपी दिव्या सिंह पात्राच्या एंट्रीमुळे मालिकेत नवा ट्विस्ट पाहयला मिळत आहेत. एसीपी दिव्या सिंहची भूमिका मराठमोळी अभिनेत्री नेहा खान हिने साकारली आहे. आता ही मालिका चांगलीच गाजत असताना नेहा खान मालिका सोडणार असल्याची चर्चा रंगत आहेत. नेमक्या कोणत्या कारणासाठी नेहा खान मालिका सोडत आहे. याविषयी उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण ‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये नेहा झळकणार असल्याने नेहा खान मालिका ही मालिका सोडणार असे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे ‘बिग बॉस मराठी ३’ च्या नव्या सिझनमध्ये नेहा खान दिसणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या मालिकेत नेहा खानच्या जागी इन्स्पेक्टर शिंदेची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता या मालिकेत अजित कुमार देव सुटतो का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुळ अमरावती जिल्ह्यात लहानाची मोठी झालेली नेहा खान मोठ्या कष्टाने बॉलीवूड आणि मराठी मालिकांमध्ये एंट्री घेतली. अधिक मेहनतीने तिने आपले स्वत:चे करियर घडवले. काही दिवसापूर्वी याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये नेहाने तिच्या लहानपणी भोगलेल्या कष्टाची माहिती दिली होती. या व्हिडिओमध्ये नेहा खान म्हटले होते की, माझ्या आईला तिच्या वडिलांकडच्या लोकांनी जब्बर मारहाण केली होती. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने आईला ३७० टाके पडले.
ही मारहाण संपत्तीच्या वादातून झाली होती. त्यामुळे माझ्या आईला अशा अवस्थेत काम करणे कठीण होते.
त्यामुळे मला आणि माझ्या भावाला लहान वयातच काम करावे लागले. आम्ही रस्त्यावर जाऊन कुल्फी विकायचो असे ती म्हणाली. माझ्यासोबत माझा भाऊ देखील असायचा. मात्र, कालांतराने मी मुंबईला पळून आले. त्यानंतर बॉलिवूडमध्ये मी माझे फोटोग्राफ दिले. त्यानंतर मला काही जाहिरातीमध्ये संधी मिळाली. असेही नेहा म्हणाली. सध्या नेहा खान ‘देवमाणूस’ या मालिकेतून आपले अभिनय क्षेत्रातील नशिब आजमावत आहे.