अहिल्यानगर लष्कर परिसरात घरफोडी करणारे चोरटे जेरबंद ; भिंगार पोलिसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर : लष्कराच्या परिसरात घरफोडी करणारे चोर मुद्देमालासह पकडण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले आहे. संतोष अशोक खरात (रा. दरेवाडी), राधा सखाराम कोलूगडे (रा. वांगी ता.जि. बीड हल्ली रा. सोमेश्वर नगर जि.बीड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि जगदीश मुलगीर यांच्या सूचनेनुसार पोउपनि गजेंद्र इंगळे, पल्लवी वाघ, पोलीस अंमलदार बाबासाहेब अकोलकर, रामनाथ डोळे, प्रमोद लहारे, कांतीलाल चव्हाण, कल्पना काशीद आदींच्या टिमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.३ फेब्रुवारी २०२३ रोजी एम.आय.आर.सी गेट नं २ ए बिल्डींग नं ३० ओटीएम या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी विविध कंपनीचे बिल्डींग मटेरियल रुममध्ये सिल करुन ठेवलेले असतांना त्या रुमचे दरवाजाचा कडी कोयंडा व पाठीमागील बाजुचा दरवाजा पूर्णपणे तोडून आत प्रवेश करुन १६ लाख ३ हजार ६५१ रुपये किंमतीचे बिल्डींग मटेरियल राधा कलगुडे, संतोष खरात यांनी चोरी करुन नेले आहे, या सुभेदार नुर इस्लाम अब्दुल वहाब (रा.एम.आय.आर.सी गेट नं ०७ सोलापुररोड अहिल्यानगर)यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुं.र.नं ५३८/२०२३ भादवी कलम ४५४,४५७,३८०,३४ प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करीत असतांना आरोपी हे गुन्हा घडल्यापासून फरार झाले होते. ते बीड येथे पळून गेल्याची माहीती मिळाल्याने पेठ पेलीस ठाणे ( बीड) यांच्या मदतीने गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवताच त्यांच्याकडून चोरी गेले माला पैकी ४ लाख ११ हजार ८०८ रुपये किमतीचे बिंल्डींग मटेरियल हस्तगत केले आहे. आरोपी संतोष अशोक खरात (रा. दरेवाडी), राधा सखाराम कोलूगडे (रा. वांगी ता.जि. बीड हल्ली रा. सोमेश्वर नगर जि.बीड) यांना ताब्यात घेऊन त्याना गुन्ह्यात अटक करण्यात आली. पुढील तपास चालू आहे.