गंभीर गुन्ह्यात असणा-यांवर केली कोतवाली पोलिसांनी कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर : शहरातील दिल्लीगेट परिसरात कोतवाली पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघांकडून बंदुकी गॅस लायटर जप्त करण्यात आले आहे.
प्रफुल्ल अनिल मिरपगार (वय १९, रा. मिरी, ता. पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर), शिमोन जनार्दन मिरपगार (वय १८, रा. मिरी, ता. पाथर्डी, जि.अहिल्यानगर हल्ली रा. दिल्लीगेट, अहिल्यानगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे असून, ही दोघे गंभीर गुन्ह्यातील असल्याने पोलिसांना पाहिजे होते.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार पोउपनिरीक्षक प्रवीण पाटील, कैलास कपीले, पोहेकॉ. योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, संदिप पितळे, सलीम शेख, पोकॉ. दीपक रोहोकले, तानाजी पवार, अभय कदम, अतुल काजळे, सुरज कदम, सचिन लोळगे, अमोल गाडे, संकेत धिवर, राम हंडाळ, विजय गावडे आदींच्या टीमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२१ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार कोतवाली पोलिसांनी दिल्ली गेट परिसरात संशयितांचा शोध घेतला असता ते दिल्लीगेट परिसरात मिळून आले. दोघांना पोलीसांची ओळख करुन देऊन त्यांचे नाव पत्ता विचारला, असता त्यांनी त्यांचे नाव प्रफुल्ल अनिल मिरपगार , शिमोन जनार्दन मिरपगार असे असल्याचे सांगितले. त्याच्यातील शिमोन जनार्दन मिरपगार यांच्या ताब्यात बंदुकी सारखे दिसणारे गॅस लायटर मिळून आले. या दोघांना चौकशीकामी कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दोघांबाबत त्यांच्या मुळ पत्ता मिरी असल्याने पाथर्डी पोलीस ठाण्यात चौकशी केली असता प्रफुल्ल अनिल मिरपगार याच्याविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९(१),१८९(२)(४), १९०,१९१(२), १९१(३), ३२४(२), ११८(१),३५१(२),३५२ प्रमाणे दि.१३ फेब्रुवारी २०२५ रोजी दाखल असल्याचो माहीती मिळाली. गुन्ह्याच्या पाथर्डी चे तपास अधिकारी पोउपनिरी जाधव यांना संपर्क करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासात प्रफुल्ल अनिल मिरपगार यांना पाथर्डी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.