सुप्यात ३ ठिकाणी छापे, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त ; ‘नगर एलसीबी’ची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online news Natwork
पारनेर : तालुक्यातील सुपा येथे गुटखा, सुगंधीत तंबाखू विक्रेते व वाहतूक करणाऱ्या ३ ठिकाणी छापा टाकून तब्बल ६ लाख ९४ हजार ३९८ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई अहिल्यानगर एलसीबी टिम’ने केली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व नगर ग्रामीण डिवायएसपी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सूचनेनुसार एलसीबीचे पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, बाळासाहेब गुंजाळ, रोहित येमुल, रणजित जाधव, रोहित मिसाळ आदींच्या टिमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी टिम’ने सुपा पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यावसायिकांची माहिती काढली.
दि.२६ डिसेंबर २०२४ ला सुपा पोलीस ठाणे हद्दीमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक होईल, अशा खादयपदार्थ सुगंधीत तंबाखू, पानमसाला, गुटखा विक्री व वाहतूक करणा-यांची माहिती काढून, पंचासमक्ष ३ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यामध्ये सुपा पोलीस ठाण्यात ८ आरोपीविरुध्द ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीचे ताब्यातून विविध कंपनीचा पानमसाला, गुटखा, तंबाखु व वाहने असा ६ लाख ९४ हजार ३९८ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.