जागतिक ध्यान दिना निमित्त सहजयोग परिवाराच्या वतीने आशा स्केर मध्ये महालक्ष्मी पथ सिनेमाचे विनामूल्य आयोजन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर : संयुक्त राष्ट्र संघाने नुकतेच दि.२१ डिसेंबर हा दिवस “जागतिक ध्यान दिन” म्हणून साजरा करण्याचे सर्व देशांना आवाहन केले आहे.
मेडिटेशन म्हणजेच ध्यानधारणा ही सामूहिकतेत केल्याने त्याचे प्रचंड फायदे झाल्याचे जगभरातील शास्त्रज्ञांना दिसून आल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने म्हटले आहे.
सहजयोग ध्यानधारणा साधना ही सर्व जाती धर्मा च्या व सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी विनामूल्य आहे व ती सहजपणे करता येते. त्यासाठी कुठल्याही प्रकारचे व्यायाम करावे लागत नाही. साधे सोपे ध्यान आहे.
अहिल्यानगर सहजयोग परिवाराच्या वतीने आशा स्केर या सिनेमा गृहात सहजयोगा वर आधारित महालक्ष्मी पथ हा सिनेमा नगरकरांना शनिवार सकाळी 9.45 वा. व रविवारी सकाळी 9.45 वा. असे दोन्ही दिवस विनामूल्य दाखविण्यात येणार असल्याची माहिती परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, चंद्रकांत रोहोकले, कुंडलिक ढाकणे व अमित बुरा यांनी एका पत्रकान्वये केली आहे.
ज्यांना ध्यानधारणा शिकायची आहे त्यांनी 1800 2700 800 या टोल फ्री नंबर वर कॉल केल्यावर संपूर्ण माहिती दिली जाईल व ध्यानधारणे संदर्भातील व्हिडिओच्या लिंक पाठवल्या जातील. तसेच दर शनिवारी सायंकाळी ५ वाजता लर्निंग सहजयोगा यूट्यूब चैनल वर आपणांस नवीन साधकांसाठी असलेले विनामूल्य मार्गदर्शन असते त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समन्व्यक डॉ. अशोक अकोलकर यांनी केले आहे.
7447441505
हा व्हाट्सअप नंबर सेव केल्यावर तो ओपन करून
Marathi हा शब्द टाईप केल्यावर मराठी भाषेतील ध्यानधारणे विषयीचे सर्व व्हिडिओची लिंक आपल्याला मिळेल. ही लिंक ओपन करून आपण ध्यान धारणा शिकू शकता.
Hindi टाइप केल्यावर हिंदी भाषेतील सर्व माहितीचे व्हिडिओ बघायला मिळतील.
English हा शब्द टाईप केल्यावर इंग्रजी भाषेतील सर्व व्हिडिओची लिंक मिळेल.
जागतिक ध्यान दिना निमित्ताने 21 डिसेंबर रोजी Learning Sahajayoga YouTube Channel वर लाईव्ह कार्यक्रमाद्वारे 4 वाजता इंग्रजीत, 5 वाजता हिंदीत आणि 6 वाजता मराठी भाषेतून “सहज योग ध्यान” कार्यक्रम आयोजित केला आहे.
प्रत्येक कार्यक्रम 30 मिनिटांचा असेल.
या सुवर्णसंधीचा सर्व ध्यानधारणा शिकू इच्छिणाऱ्या साधकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सहजयोग ध्यान केंद्र पारोळा तर्फे तालुकाप्रमुख संजय चौधरी सर यांनी केले आहे.