व्यापाऱ्यास जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणारे दोघं अटक : ‘अहिल्यानगर एलसीबी’ला यश
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (video news)
अहिल्यानगर: बनावट आधारकार्डचा वापर करून खरेदी केलेल्या सीमकार्डद्वारे अहिल्यानगर शहरातील व्यापाऱ्यास जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणा-या दोघांना पकडण्यात ‘अहिल्यानगर एलसीबी’ यश आले आहे. अजय अरूण साळवे (वय ४२, रा.माधवबाग, आलमगीर, भिंगार), पवन प्रमोद उघडे (वय २४, रा.घर नं.७९, सदरबाजार, भिंगार, अहिल्यानगर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, , अहिल्यानगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सूचनेनुसार एलसीबीचे पोसई तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संदीप पवार, संतोष खैरे, सागर ससाणे, रविंद्र घुंगासे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व महादेव भांड आदींच्या टिमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.१४ डिसेंबर २०२४ ला सर्जेपुरा येथून घरी जात असताना अज्ञातांनी दुचाकीवर येऊन आडवून ‘भाई का फोन आयेगा उठालो’ असे म्हणून निघून गेले. त्यानंतर मोबाईलवर मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली, या किरण मोहनलाल रांका (वय ५६, रा.आदर्श कॉलनी, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 1318/2024 बीएनएस कलम 126 (2), 351 (2) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगर शहरातील व्यापाऱ्यास दिलेल्या धमकी प्रकरणी प्राथमिक माहिती मिळताच एसपी राकेश ओला यांनी पोनि दिनेश आहेर यांना गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याबाबत आदेश दिले.
एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी एलसीबी तपासी टीमला सूचना देताच, एलसीबी टिम’ने दि.१८ डिसेंबर २०२४ ला घटना ठिकाणांची सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा अहिल्यानगर शहरामध्ये शोध घेत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, गुन्ह्यातील संशयीत आरोपी हे रामवाडी रोड, तारकपूर येथे विना क्रमांकाचे ॲक्टीव्हा दुचाकीसह थांबलेले आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे एलसीबी तपास टीमने रामवाडी रोडवर संशयीत विनाक्रमांकाचे ॲक्टीव्ही दुचाकीवरील त्या संबंधितांचा शोध घेऊन ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी नाव अजय अरूण साळवे, पवन प्रमोद उघड असे असल्याचे सांगितले.
एलसीबी टिम’ने पंचासमक्ष आरोपीची अंगझडती घेऊन, आरोपीचे ताब्यातून ८२ हजार रु. किं.चा मुद्देमाल त्यात एक ग्रे कलरची ॲक्टीव्हा, नोकीया व जिओ कंपनीचे मोबाईल, विजय अरूण नवगिरे याचे आधारकार्ड पॅनकार्ड व बॅक पासबुक, एक रबरी स्टॅम्प, अनोळखी इसमाचे फोटो असा मुद्देमाल जप्त केला आहे.
ताब्यातील आरोपी अजय अरूण साळवे यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता, त्याने खोट्या कागदपत्रांचा वापर करून दीपक राजू भुजबळ (रा.घासगल्ली, कोठला, अहिल्यानगर) याच्या विजय अरूण नवगिरे, (रा.कल्याण रोड, शिवाजीनगर) या नावाने बनावट कागदपत्राच्या आधारकार्ड तयार केले. त्या बनावट आधारकार्डच्या आधारे वेगवेगळी कागदपत्रे तयार केली. आरोपी अजय साळवे याने व्यापारी किरण रांका यांच्याकडून खंडणी वसुल करण्याचे उद्देशाने दि.२२ नोव्हेंबर २०२४ ला बनावट कागदपत्रावरून त्याने एअरटेल कंपनीचे नवीन सिमकार्ड घेतले. दि.१४ डिसेंबर २०२४ च्या रात्री ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास आरोपी पवन प्रमादे उघडे याच्यासह ॲक्टीव्ही दुचाकीवर जाऊन फिर्यादीस आडवून धमकावले. त्यानंतर त्यांच्याकडील नोकीया मोबाईलद्वारे फिर्यादीस यांना खंडणी मागण्याकरीता धमकी दिल्याची माहिती सांगितली.
ताब्यातील आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी तोफखाना पोलीस ठाण्यात मुद्देमालासह हजर करण्यात आले आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस हे करीत आहे.