गावडे मळ्यातील डीपी रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन मा. मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून संपन्न
विकास कामातून नगर शहराची खेड्याची उपमा संपुष्टात येईल – ॲड. विजय अत्रे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Network
अहिल्यानगर : नागरिकांची अपेक्षा तरी काय असते ? लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेज या प्राथमिक सुविधा मिळाव्यात आणि जेणेकरून कुठल्याही समस्याला सामोरे जावे लागणार नाही यासाठी लोकप्रतिनिधींनी काम करणे गरजेचे असून शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी सावेडी उपनगरामध्ये विकासाच्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वच कामे मार्गी लागली जात आहे, त्यामुळे आपल्या शहराला खेड्याची उपमा दिली जात होती आता ती संपुष्टात येईल प्रभाग क्रमांक १ मधील विकासाच्या कामासाठी माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर व माजी नगरसेवकांनी सर्वांना बरोबर घेऊन कायमस्वरूपीचे प्रश्न मार्गी लावले असल्याचे प्रतिपादन ॲड. विजय अत्रे यांनी केले
गावडे मळ्यातील डीपी रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन मा. मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून संपन्न झाले, यावेळी माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, माजी नगरसेविका मीना चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते पै. शिवाजी चव्हाण, एडवोकेट विजय अत्रे, योगेश दुबे, प्रवीण गवळी, संजय सैदर, विकास वागस्कर विजय औटी, सतीश भदर्गे, प्रवीण वावडे, धनाजी राऊत, ए,ए.कुलकर्णी, वैभव वाळेकर आदी उपस्थित होते.
डॉ. सागर बोरुडे म्हणाले की, गावडे मळा परिसरामध्ये मोठी लोक वसाहत असून या परिसरातील गोकुळधाम ते न्यायमंदिर परिसरातील डीपी रस्ता काँक्रीटकरण्याचे काम मार्गी लागत असल्यामुळे या परिसरातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे आ. संग्राम जगताप यांच्याकडे विकास कामांसाठी पाठपुरावा केल्यामुळे प्रभागाच्या विकासासाठी मोठ्या निधी प्राप्त झाला आहे प्रभागातील कॉलनीअंतर्गत रस्त्याची कामे सुरू आहेत असे ते म्हणाले.
पै. शिवाजी चव्हाण म्हणाले की,आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील विकासाची कामे हाती घेतली आहे यापूर्वी कधीही न झालेली कामे त्यांनी मार्गी लावले आहेत, प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी वृक्षरोपण, क्रीडांगणे, आरोग्य सुविधा नागरिकांना सहजरीत्या उपलब्ध होण्यासाठी नागरिकांनाही विकासाच्या कामांमध्ये सहभागी करून घेतले जात आहे, प्रभाग क्रमांक १ या नावाप्रमाणे विकासाची कामे केली जातील आणि प्रभागाचा विकास कामातून शहरांमध्ये नावलौकिक निर्माण करू असे ते म्हणाले.