भिंगार अर्बन बँकेच्या वतीने आमदार शिवाजीराव कर्डीले यांचा सत्कार
भिंगार बँकेने ग्राहकांना पत निर्माण करुन दिली – आ.शिवाजीराव कर्डीले
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Network
अहिल्यानगर – कोणतीही आर्थिक संस्था ही प्रामाणिकपणावरच प्रगती करत असते. तुमचा उद्देश चांगला असला की लोकही तुमच्याशी जोडले जातात. भिंगार बँकेने अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांपासून उद्योजक, व्यवसायिकांना केलेल्या अर्थसहाय्यामुळे त्यांची भरभराट झाली. बँकींग क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा स्विकार करुन केलेल्या बदलांमुळे ग्राहकांना तत्पर सेवा मिळत गेल्याने बँकेवरील विश्वास वाढतच आहे. संचालक मंडळाच्या पारदर्शी कारभारामुळे बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. बँकेने विविध योजनांच्या माध्यमातून ग्राहकांना पत निर्माण करुन दिली. आज बँकेचे कामकाज पाहून आनंद होत आहे, लोककल्याणासाठी बँकेने तत्पर राहून प्रगती साधावी, असे आवाहन आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी केले.
भिंगार अर्बन बँकेच्या वतीने सहाव्यांदा आमदार शिवाजीराव कर्डीले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी चेअरमन अनिलराव झोडगे . व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी, संचालक राजेंद्र पतके ,कैलास खरपुडे,विष्णू फुलसोंदर,महेश झोडगे ,माधवराव गोंधळे ,रुपेश भंडारी ,कैलास रासकर ,कैलास दळवी , तिलोत्तमा करांडे , अनिता भुजबळ, रामसुख मंत्री ,राजेंद्र बोरा , मुख्य कार्य.अधिकारी शशिकांत महाजन आदिसह मछिंद्र चॊधरी ,अमोल धाडगे उपस्थित होते.
याप्रसंगी चेअरमन अनिलराव झोडगे म्हणाले, भिंगार बँकेला शतकोत्तर विश्वासाची परंपरा लाभली आहे. सर्वांच्या विश्वासाला पात्र राहून संचालक मंडळ कारभार करत आहे. आधुनिकतेचा स्विकार करुन इतर बँकेच्या बरोबरीने सेवा दिली आहे. त्यामुळे समाधानी ग्राहक हीच बँकेचे धोरण आहे. आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे लोकाभिमुख कार्य निवडणुकीसाठी उपयुक्त ठरले आहे,तसेच त्यांना मंत्रिपदासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .
यावेळी व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी यांनी बँकेच्यावतीने सुरु असलेल्या विविध योजना व कामकाजाची माहिती दिली.
सूत्रसंचालन मुख्य कार्य.अधिकारी शशिकांत महाजन यांनी केले तर प्रास्तविक कैलास रासकर यांनी तर आभार केलास खरपुडे यांनी मानले.