माळी समाजाचे व जगताप परिवार वर्षानुवर्षांचे ऋणानुबंध : माजी आमदार अरुण जगताप
आमदार संग्राम जगताप यांना सकल माळी समाजाचा पाठिंबा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर – संत सावता महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे विचार घेऊन नगर शहरामध्ये माळी समाज वाटचाल करीत आहे. शहरातील माळी समाजाचे व जगताप परिवार वर्षानुवर्षांचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे माळी समाज नेहमीच जगताप कुटुंबा सोबत आहे. जगताप कुटुंबीय वारकरी संप्रदाय जपत सर्व संत मंडळींच्या व संत सावता महाराजांच्या शिकवणी प्रमाणे नगर शहरात कार्य करीत आहे. सारसनगरच्या सावित्रीबाई फुले नगर प्रवेशद्वार कमानीला शासनाचा नीधी उपलब्ध होत नसल्याने जगताप परिवाराच्यावतीने स्वखर्चाने सावित्रीबाई फुले नगर प्रवेशद्वार कमानीचे काम सुरु करून ते पूर्णत्वास येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील माळी समाजाने आ. संग्राम जगताप यांना पाठिंबा दिल्याने त्यांच्या विजयात मोलाची भर पडणार आहे.याबद्दल मी सकल माळी समाजाचा आभारी आहे, असा विश्वास माजी आमदार अरुण काका जगताप यांनी दिला आहे.
विधानपरिषदेचे सदस्य आ. योगेश टिळेकर संस्थापित संत सावता क्रांती परिषदेच्या अहिल्यानगरच्या शाखेचा शुभारंभ माजी आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहरातील सकाळ माळी समाजाच्या वतीने महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना एकमताने जाहीर पाठींबा देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले होते. यावेळी उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, सचिव राजेंद्र पडोळे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, प्रा.माणिक विधाते, ज्ञानेश्वर रासकर, बाळासाहेब आगरकर, डॉ.रणजीत सत्रे, विनोद पुंड, प्रकाश शिंदे आदींश मोठ्या संख्यने माली समाजातील महिला व नागरिक उपस्थित होते.
प्रास्ताविकात किशोर डागवाले म्हणाले, आ,संग्राम जगताप यांच्या सहकार्याने सावित्रीबाई फुलेनगर नामकरण, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्यास मंजुरी मिळाली असून लवकरच उभारण्यात येणार आहेत. माळी समाजाला विविध उपक्रमांसाठी जागेची गरज होती. समाजाची ही मागणी आ.संग्राम जगताप यांनी त्वरित पूर्ण करत महानगरपालिकेच्या माध्यमातून दोन एकर जागेचा भुखंड मिळाला आहे. आमदार संग्राम जगताप यांनी समाजाच्या कामासाठी नेहमीच सहकार्य केले आहे. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत सकल माळी समाजाने आ.जगताप यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना विजयी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्ञानेश्वर रासकर म्हणाले, नगरमध्ये प्रथमच माळी समाजाने अशी बैठक घेवून आमदारकीच्या निवडणूकीसाठी एखाद्या उमेदवाराला जाहीर पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आ.संग्राम जगताप यांच्या सारख्या सक्षम व २४ तास उपलब्ध असलेल्या उमेदवाराला पाठींबा देण्याचा समाजाचा हा ऐतिहासिक निर्णय योग्यच आहे. यासाठी सकल माळी समाज एकवटला आहे.
धनंजय जाधव म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. त्यांनी गेल्या दहा वर्षात शहराच्या विकासासाठी तब्बल ५०० कोटी रुपयांचा भरीव निधी आणून शहरात विकासात मोलाची भर घातली आहे. आपण सर्वांनी मिळून संग्राम जगताप यांना पुन्हा आमदार करण्यासाठी एकत्रित येऊन काम करू. माझा वर्गमित्र आमदारकीची हॅटट्रिक करणार याचा मोठा अभिमान मला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनुरीता झगडे यांनी केले. बाळासाहेब भुजबळ यांनी आभार मानले. यावेळी वसंतराव आगरकर, संतोष गोंधळे, अनिल इवळे, मच्छिंद्र बनकर, कॅप्टन सुधीर पुंड, गजानन ससाने, अशोक आगरकर, प्रकाश इवळे, निलेश चिपाडे, सुरेश आंबेकर, राहुल रासकर, सुरेश कावळे, अमोल भांबरकर, ब्रिजेश ताठे, दीपक खेडकर, अमित खामकर, दत्ता गाडळकर, भानुदास बनकर, चंद्रकांत पुंड, रोहित पठारे, रोहन डागवाले, गणेश शिंदे, मनोज भुजबळ, कल्याणी गाडळकर, रेणुका पुंड, किरण कोतवाल, सुरेखा घोलप, रोहिणी बनकर, विजय भांबरकर आदींसह माळी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.