शहरातील चौकाचौकात चित्रफित पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः नगर शहरात आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या विकासनिधीतून झालेल्या विविध ठिकाणी झालेल्या विकासकामांची चित्रफीत चौकाचौकात एलईडी स्क्रीनवर दाखविण्यात आले. दरम्यान विकास कामांच्या चित्रफीत पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये शहर विकासाचे नियोजन करून राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये विविध विकासाची प्रकल्प शहरात उभे राहत आहे, रस्त्याच्या विकास कामासाठी शासनाकडून 150 कोटीचा निधी मिळाला असल्यामुळे शहरात विविध भागांमध्ये रस्ता काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत, याचबरोबर म्युझिकल फाउंटन, स्पोर्ट क्लब, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची निर्मिती शहरातील विविध भागात स्टॅच्यू, फेज टू पाणी योजना, अमृत भुयारी गटार योजना आधीसह विविध कामे एलईडी स्क्रीन द्वारे शहरातील चौका चौकात दाखवली जात आहे ते पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असून केलेल्या विकास कामाचे कौतुक करताना दिसत आहे.