नगर शहर विधानसभा मतदारसंघ भाजपाला द्यावा, नगर शहर विधानसभा कार्यकर्ता बैठकीत सुर
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : नगर शहर विधानसभा मतदारसंघ भाजपाला द्यावा, या मागणीचा सुर नगर शहर विधानसभा कार्यकर्त्यांच्या शनिवारी आयोजित बैठकीत उमटला. या मागणीचा प्रस्ताव भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्याचा ठराव संमत करण्यात आला.
यावेळी नाहीत मैत्रिपूर्ण लढत व्हावी, अशी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मागणी केली. ् भा्जपाचे नगर शहरातील नेते वसंत लोढा, भैय्या गंधे, अभय आगरकर, बाबासाहेब वाकळे, दामोदार बाटेजा, सुनिल रामदासी, मधुसूदन मुळे, तुषार पोटे, मयुर बोचुघोळ, प्रिया जानवे, महेश नामदे, रामदास आंधळे, नरेंद्र कुलकर्णी, सविता कोटा, प्रशांत मुथ्था, बाळासाहेब भुजबळ, मिलिंद भालसिंग, सविता गिल्डा, सुरेखा विद्ये, कालिंदा केसकर, वसंतराव राठोड, शिवाजीराव दहिहांडे, अनिल मोहिते आदींसह नगर भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.