१२ तासांच्या आत चारचाकी गाडी पकडली अन् मिळाला साडेचार किलो गांजा ; तोफखाना पोलिसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : अवघ्या १२ तासांच्या आत तोफखाना पोलीसांनी पकडले, पण त्याच्या गाडीत मिळाला साडेचार किलो गांजा मिळाला.
एसपी राकेश ओला, अ.नगर अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलिस ठाण्याचे पोनि आनंद कोकरे यांच्या सूचनेनुसार पोउपनि सचिन रणशेवरे, पोउपनि अमोल गायधनी, पोहेकॉ दत्तात्रय जपे, पोहेकॉ सुनिल शिरसाट, पोहेकॉ दिनेश मोरे, पोहेकॉ अहमद इनामदार, पोहेकॉ भानुदास खेडकर, पोहेकॉ सुधीर खाडे, पोना सुरज वाबळे, पोना संदिप धामणे, पोकॉ शिरीष तरटे, पोकॉ दत्तात्रय कोतकर, पोकॉ बाळासाहेब भापसे,पोकॉ सुमीत गवळी, पोकॉ सतीष त्रिभुवन, पोकॉ सतीष भवर यांचे पथकाने व मोबाईल सेलचे पोकॉ राहुल गुंडू व पोकॉ नितीन शिंदे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.११जून २०२४ रोजी बोल्हेगांव येथे अविनाश मांडगे यांच्या मोपेड दुचाकीस चारचाकी वाहनाने धडक देऊन त्यांना खाली पाडून त्यांच्याकडील १७ हजार रु किंमतीचे मोबाईल हॅण्डसेट व २ लाख रुपये रोख रक्कम बळजबरीने हिसकावून त्यांच्याकडील चारचाकी वाहनातून पळून गेले, या फिर्यादीवरुन गु.र.नं.
७१६/२०२४ भा.दं.वि.क ३९२,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्ह्याचा तपासकामी तोफखाना पोलीस टिम तयार केली. गुन्ह्याचा तपासात असताना पोनि आनंद कोकरे यांना माहीती मिळाली की, गुन्हा हा प्रकाश रावसाहेब उमाप (वय २२, रा. सुडके मळा, गणपती मंदिराचे पाठीमागे बालीकाश्रम रोड, अहमदनगर), प्रतिक सतीष सुडके (वय २३, रा. सुडकेमळा नवनाथ मेडिकलजवळ,अ.नगर) यांनी व त्याच्या साथीदारांनी केला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोनि श्री कोकरे यांच्या सूचनेनुसार तोफखाना पोलीसांनी सापळा लावला. या सापळ्यात गुन्हयातील आरोपी तुषार अनिल मोरे (वय २२, रा. नाव्हरा, राजु कॉम्प्लेक्स जवळ, ता. शिरुर जिल्हा पुणे), बादल राजु बोराडे (वय १९ रा.प्रेमदान हाडको, चिकु भिंगारदिवे यांच्या घरात भाडोत्री अहमदनगर), ओंकार इश्वर कोरेकर (वय १९ रा. नाव्हरा कोरेकर वस्ती ता.शिरुर जि. पुणे), प्रकाश रावसाहेब उमाप (वय २२, रा. सुडके मळा, गणपती मंदिराचे पाठीमागे बालीकाश्रम रोड, अहमदनगर), प्रतिक सतीष सुडके (वय २३ रा. सुडकेमळा नवनाथ मेडीकल जवळ,अ.नगर) असे होंन्डा सिटी कार (एमएच ४६, एएल ६८९७) या गाडीसह नगर कल्याण रोडवर मिळून आले.
आरोपींना तोफखाना पोलीसांनी ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडील होंन्डा सिटीकारमधून उग्रवास आल्याने कारची झडती घेतली असता गाडीमध्ये सुमारे साडेचार किलो वजनाचा गांजा नावाचा अंमली पदार्थ मिळून आला. त्यावरुन आरोपी तुषार अनिल मोरे, बादल राजु बोराडे , ओंकार इश्वर कोरेकर याच्याविरुध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुरनं ७१८/२०२४ एन डी पी एस कायदा कलम ८ (क) २० (ब)(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनिरी सचिन रणशेवरे व पोउपनिरी शैलेश पाटील हे करीत आहेत.