जिल्ह्यात तलवार बाळगणारे ताब्यात ; नगर एलसीबी’ची धडाकेबाज कारवाई

जिल्ह्यात तलवार बाळगणारे ताब्यात ; नगर एलसीबी’ची धडाकेबाज कारवाई
Crime news
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
नगर : नगर जिल्ह्यात अवैधरित्या तलवार बाळगून दहशत करणाऱ्या तिघांना ‘नगर एलसीबी’ने ताब्यात घेतले आहे.


पोलीस ठाणे गुरनं व कलम आरोपीचे नाव जप्त माल याप्रमाणे राहाता पोलिस ठाणे गु.र.नं. २८५/२४ आर्म ॲक्ट ४/२५ राहुल शिवाजी इंगळे (वय २४, रा. इंदीरानगर, पुणतांबा, ता. राहाता) १ हजार रु.कि. स्टीलची तलवार, नेवासा गु.र.नं. ५६८/२४ आर्म ॲक्ट ४/२५, शेखर दादासाहेब आहिरे (वय ३१, रा. नेवासा फाटा, ता. नेवासा)१० हजार रु.कि. लोखंडी तलवार, श्रीरामपूर शहर गु.र.नं.६०९/२४ आर्म ॲक्ट ४/२५ राधाकिसन गणपत जाधव (वय ४५, रा. राजणखोल, ता. राहाता) ५ हजार रु.कि. लोखंडी तलवार, अशी पकडण्यात आलेल्यांची नावे असून, ३ गुन्ह्यातील आरोपींकडून १६ हजार रु.किं. ३ विविध प्रकारच्या तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.


एसपी राकेश ओला, अ.नगर अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुभर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, विशाल दळवी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, संतोष लोढे, सचिन अडबल, संदीप चव्हाण, रणजीत जाधव, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ व उमाकांत गावडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
निवडणूक सन २०२४ निकालाच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून अवैध अग्नीशस्त्रे, घातक हत्यारे वापर, वाहतुक, विक्री व बाळगणे या सारख्या गैरप्रकारांना प्रतिबंध होणे करीता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी विशेष मोहिम राबविण्याबाबत आदेश केले आहेत. आदेशान्वये एसपी राकेश ओला यांनी एलसीबीचे पोनि श्री. आहेर यांना तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना अवैध शस्त्रे बाळगणा-या इसमांची माहिती घेऊन आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुषंगाने पोनि श्री. आहेर यांनी एलसीबीच ३ वेगवेगळी टिम नेमल्या होत्या. तिन्ही एलसीबी टिम’ने विशेष मोहिमे दरम्यान दि.११ जून २०२४ रोजी जिल्ह्यातील तिघांविरुध्द कारवाई करुन त्यांचे कब्जातून १६ हजार रुपये किंमतीच्या ३ तलवारी मिळून आल्याने त्या जप्त करुन आरोपी विरुद्ध 3 गुन्हे दाखल केले आहेत.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!