कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाया सुरू
बनावट दारु विक्री करणाऱ्या अड्ड्यावर छापा, माळीवाड्यात चोरटा पकडला
Crime news संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
अहमदनगर : बेकायदेशीररित्या बनावट दारु विक्री करणाऱ्या अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा कोतवाली पोलिसांनी छापा टाकून एकास ताब्यात घेण्याची कारवाई केली.
कोतवाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये विनापरवाना देशी बेकायदेशीररित्या बनावटीची दारु विक्री करणाऱ्या अड्ड्यावर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि प्रताप दराडे यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात दारु जप्त करून एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले . ही कारवाई शहरातील माळीवाडा परिसरातील येथील शिवम टॉकीजच्या भिंतीच्या आडोशाला सुरु असलेल्या अड्ड्यावर केली. माळीवाडा येथील शिवम टॉकीजच्या भिंतीच्या आडोशाला एकजण देशी बॉबी, संत्रा कंपनीच्या दारूच्या बाटल्या विकत असल्याची माहिती पोनि श्री दराडे यांना मिळाली होती मिळाली. त्या माहितीवरून पोनि श्री दराडे यांच्या सूचनेनुसार कोतवाली पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे एकजण बसलेला दिसला. त्याच्या पुढे एक खाकी पुठ्ठ्याच्या बॉक्स दिसून आला. पोलिसांची खात्री होताच पोलीसांनी तेथे छापा टाकला. पोलिसाना पाहताच तो पळू लागल्याने पोकॉ दीपक रोहकले यांनी त्याला जागीच पकडले. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव कुंदन रत्नाकर बनकर (वय ५४ रा. पाटील हॉस्पिटल शेजारी, कोठी मार्केटयार्ड रोड, अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. पोलीसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ देशी बॉबी, संत्रा कंपनीच्या ११ दारु बाटल्या मिळून आल्याने पोलिसांनी तो मुद्देमाल जप्त केला. कुंदन बनकर यास ताब्यांत घेतले. बनकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम कलम ६५ (इ) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली. ही कारवाई एसपी राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर डिवायएसपी अमोल भारती यांच्या आदेशानुसार कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार पोकाॅ दिपक रोहकले, सुरज कदम,अविनाश वाकचौरे,तानाजी पवार,सत्यम शिंदे,सुजय हिवाळे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
माळीवाडा बसस्थानक परिसरात चोरटा पकडला ; ‘कोतवाली’ची कारवाई
नगर शहरातील माळीवाडा बस स्थानक येथे चोरी करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या अंधारात फिरणाऱ्या एकास कोतवाली पोलिसांनी पकडले.
शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात दुचाकी वाहन चोरण्याच्या किंवा प्रवाशांच्या बॅगा चापसून चोरी करण्याच्या उद्देशाने संशयित्रीच्या अंधारात वावरणाऱ्या एकास कोतवाली पोलीसांनी ताब्यात घेतले. या चोरट्यांकडून दुचाकीच्या ६ चाव्या जप्त केल्या. कारवाई ही शहरातील माळीवाडा बसस्थानक जवळ केली. कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असता रात्री १ वाजण्याच्या दरम्यान माळीवाडा बसस्थानक परिसरात सेक्टर नं. २ पेट्रोलिंगचे पोकॉ अमोल गाडे, पोकॉ अभय कदम यांना माळीवाडा बसस्थानक परिसरात माळीवाडा बसस्थानकाच्या पाठीमागील बाजुस एकजण अंधाराचा फायदा घेऊन लपवून थांबलेला दिसून आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिस त्या संशयीताजवळ गेले असता तो तेथून पळून जाऊ लागला. त्यास पोकॉ अमोल गाडे यांनी त्याला जागीच पकडले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी सुरुवातीला त्यांचे नाव पत्ता सांगणेस टाळाटाळ केली, पुन्हा विचारणा करुन त्याची कसून चौकशी करता त्यांनी त्यांची नाव प्रशांत रावसाहेब वडांगळे (वय २७, रा. चिपाडे मळा, केडगाव, अ.नगर) असे असल्याचे सांगितले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात पँटच्या खिशात १०० रुपये किंमतीच्या दुचाकीच्या ६ चाव्यां त्याच्याकडे मिळून आल्या. त्यास त्या ठिकाणी काय करत होतास, अशी विचारता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. जवळील चाव्यांच्या जुडग्याबाबत काहीएक माहीती दिली नाही. त्यावरुन हा नगर माळीवाडा बसस्थानक परिसरात दुचाकी चोरी, प्रवाशांच्या बॅगा चोरीच्या गुन्हा करण्याच्या उद्देशाने मिळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कोतवालीचे पोना संदीप साठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.