आक्षेपार्ह पोस्ट विरोधात बोधेगाव परिसरातील ओबीसी समाजा कडून पोलिसांना निवेदन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव : लोकसभा निवडणुकी दरम्यान राज्यातील बीड जिल्हा विशेष चर्चेत राहिला,निकाला नंतर सुद्धा बीड मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, अशातच काही समाजकंटकानी सोशल मिडिया वर पंकजा मुंडे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट – प्रतिक्रिया करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वर्तन केले, या घटनेमुळे दोन समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ बोधेगाव ता शेवगाव या परिसरातील ओबीसी समाज बांधवांनी आज दिनांक १० रोजी सकाळी नऊ वाजता येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे चौकात एकत्र येऊन सदरील घटनेचा निषेध व्यक्त केला आहे, सोशल मिडिया वरुन चुकीचा संदेश प्रसारित करुन समाजा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे व योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या वेळी ओबीसी बांधव करत होते.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे चौकात जमलेले ओबीसी बांधव, मुंडे साहेबांना अभिवादन करुन बोधेगाव येथील पोलिस दूरक्षेत्रात आले व पोलीस हेड कॉन्स्टेबल इश्वर गर्जे यांच्या कडे निवेदन देत, सोशल मिडिया वर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या वेळी गोपीनाथ मुंडे अमर रहे…एकच पर्व, ओबीसी सर्व… अशा घोषणा देत ओबीसी बांधवांनी पंकजा ताई मुंडे यांचे समर्थन केले.
यावेळी दिलीप खेडकर, महादेव दराडे, माजी सरपंच राम अंधारे, माणिक गर्जे, प्रकाश गर्जे, भीमा बनसोडे, लाडजळगावचे सरपंच अंबादास ढाकणे,ठाकूर पिंपळगावचे सरपंच संजय खेडकर, वंचित च्या तालुकाध्यक्ष संगीता ढवळे, भागवत भोसले,शहादेव गुंजाळ,बाबा सावळकर, आदिनाथ मासाळकर, केशव खेडकर, आजिनाथ गर्जे, भगवान गर्जे, सतिष गर्जे, भागवत शिंगाडे,मुन्नावर शेख, सचिन वाघ, सचिन खेडकर यांच्यासह बोधेगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या घटनेचा अनेकांनी निषेध केला आहे.