अंबड पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकाने स्वतःला गोळी घालून केली आत्महत्या
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नाशिक : जिल्ह्यातील अंबड पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक अशोक नजन (वय ४०) यांनी मंगळवारी दि.२० फेब्रुवारी २०२४ला सकाळी १० वाजता स्वत:च्या पिस्तूल मधून डोक्यात गोळी मारुन आत्महत्या केली. गोळी मारल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला.ते सकाळी घरातून पोलिस ठाण्यात आले. त्यानंतर ते कॅबीनमध्ये गेले. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिका-यांनी धाव घेतली