बिल्डिंग मटेरियल चोरणारे जेरबंद ; तोफखाना पोलिसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – सिरॅमिक्स नावाच्या बिल्डिंग मटेरियलच्या सामानाची चोरी करणारे चोरटे 24 तासाच्या आत जेरबंद करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. संदीप उर्फ संजू रामचंद्र गायकवाड (वय 28), मंगेश उर्फ अंकल संजू पवार (वय 23), शर्मा हुरमास काळे (वय 35 सर्व रा. नोबेल हॉस्पिटलमागे प्रेमदान हडको सावेडी अहमदनगर), राम सुदाम सौदागर (वय 23 रा. वैदुवाडी भिस्तबाग चौक अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या सोबत असणारे परम्या गायकवाड, लक्ष्मण कु-हाडे, आकाश कु-हाडे ही फरार आहेत. आरोपींकडून एक लाख रुपये किमतीचे ॲपेरिक्षा (एमएच 16 बीसी 1367) 9 हजार रुपयांची बिल्डिंग मटेरियल यात लोखंडी नळ, काॅक, जोड, टी जोड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नगर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोनि एस.पी गायकवाड यांच्या सूचनेनुसार पोउपनि सुरज मेढे, पोहेकाॅ शकील सय्यद, पोना अविनाश वाकचौरे, वसीमखान पठाण, अहमद इनामदार, पोकाॅ धीरज खंडागळे, सचिन जगताप, गोमसाळे, आंधळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.