6 राज्यांमध्ये केंद्रीय आरोग्य पथक दाखल ; वाढते कोरोनाचे संकट

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

देशात कोरोना विषाणुची दुसरी लाट ओसरत असली तरी अनेक राज्यांमध्ये परिस्थिती जैसे थेच आहे. अशातचं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. याचपार्श्वभूमीवर सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असणाऱ्या सहा राज्यांमध्ये आता केंद्रीय आरोग्य पथकाच्या टीम दाखल झाल्या आहेत. केंद्रीय मंत्रालयाच्या एका माहितीनुसार, केरळ, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, ओडिशा, छत्तीसगड, मणिपूर अशा सहा राज्यांमध्ये केंद्रीय आरोग्य पथकातील दोन जणांची टीम रवाना झाली आहे.

सध्या केरळ राज्याचा कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. केरळमध्ये गुरुवारी १२ हजार ८६८ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर आत्तापर्यंत २९.३७ लाख रुग्णांची नोंद केवळ केरळमध्ये झाली आहे. तर गुरुवारी झालेल्या १२४ कोरोनाबाधित मृतांमुळे ही संख्या १३ हजार ३५९ वर पोहचली आहे. तर गुरुवारी ११ हजार ५६४ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या २८ लाख २१ हजार १५१ झाली आहे. सध्या एकट्या केरळमध्ये १ लाख २ हजार ५८ सक्रिय रुग्ण आहे. या केंद्रीय आरोग्य पथकाकडून कोरोनाविरोधी उपाययोजना करत रुग्णसंख्या कशी कमी करात येईल यासाठी राज्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच या सहा राज्यांमधील दाखल झालेले हे पथक हे पथक राज्यात राहणार असून विविध आरोग्य भागांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे. तसेच आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करत रुग्णालयांतील बेड्स, अँब्युलन्स, व्हेंटिलेटरसह अनेक उपाययोजनांचा आढावा घेईल.राज्यांना सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसंदर्भात अनेक उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत. केंद्राच्या कोरोना प्रतिबंधनात्मक उपाययोजना योग्यरित्या राबवण्यासाठी तसेच कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथकाच्या टीम वेळोवेळी अनेक राज्यांमध्ये पाठवल्या जाणार आहे. या टीम राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांशी बातचीत करत कोरोना विषाणुविरोधात लढा देताना येणाऱ्या अडचण दूर करण्यासाठी प्रत्यक्ष काम करणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!