संग्राम सत्तेचा वृत्त्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
निवडणूक आयोग दि.13 मार्चनंतर लोकसभा निवडणूक तारखा जाहीर करू शकते, nike air force jordan jordan 5 nike air force jordan wmns air 1 mid nike air max womens air jordan 11 cmft low nike air max pre day jordan 5 air max goaterra 2.0 nike air jordan 1 mid se wmns air max 270 cheapest jordan 4s nike air max 90 air jordan 14 jordan 5 असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी आयोग अनेक राज्यांना भेटी देत आहे. एकदा हे पूर्ण झाल्यानंतर तारखांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तारखांची यादी जोरदार व्हायरल होत आहे. परंतु यामागील सत्य काय? याचा शोध घेण्याची गरज आहे.सध्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो शक्यता व्यक्त केली जात होती. आता ताज्या माहितीनुसार लोकसभेच्या तारखा 13 मार्च किंवा त्यानंतर जाहीर होऊ शकतात असे समजते.
निवडणूक आयोग 13 मार्चनंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी आयोग अनेक राज्यांना भेटी देत आहे. एकदा हे पूर्ण झाल्यानंतर तारखांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी सध्या तामिळनाडूच्या दौर्यावर आहेत, त्यानंतर उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरला भेट दिली जाणार आहे. राज्याचा दौरा 13 मार्चपूर्वी पूर्ण होणार आहे. तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी आयोग गेल्या काही महिन्यांपासून सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांसोबत (सीईओ) नियमित बैठका घेत आहे. सीईओने मतदार संघातील समस्या, ईव्हीएमची परिस्थिती, त्यांची सुरक्षा दलांची आवश्यकता, सीमेवर कडक पाळत ठेवली आहे. विशेष म्हणजे, निवडणूक आयोग यावर्षी निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याची योजना आखत आहे, अशीही माहिती समोर येत आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शक्यता
एका वृत्तानुसार, मे महिन्यापूर्वी होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर चुकीची माहिती पसरविल्यानंतर ते काढून टाकण्यासाठी ते एउख अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी एक विभाग देखील तयार केला जाऊ शकतो. त्यामुळे निवडणुकीदरम्यान सोशल मीडियावरील खोट्या आणि प्रक्षोभक मजकूर काढून टाकण्याचे काम जलद केले जाईल आणि कोणत्याही पक्षाने किंवा उमेदवाराने नियमांचे उल्लंघन केल्यास सोशल मीडियाची अकाऊंट खाती ब्लॉक करणे यासारखी कठोर कारवाई करण्यास आयोग तयार आहे.
होती 2019 निवडणूक प्रक्रिया
2019 मध्ये लोकसभेच्या निवडणूक सात टप्प्यात पार पडली होती. तेव्हा निवडणूक आयोगाने 10 मार्च रोजी घोषणा केली होती. 11 एप्रिल ते 19 मे 2019 या कालावधी सात टप्प्यात मतदान झाले होते आणि 23 मार्च रोजी निकाल जाहीर झाला होता. नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या.