संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः शिवसेनेचे उपनेते स्व.अनिल राठोड यांचे बुरूडगाव येथील जुने सहकारी तसेच हिंदु हृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे एकनिष्ठ शिवसैनिक, बुरुडगावचे तत्कालीन माजी नगरसेवक स्व.अरूणभाऊ शिंदे यांच्या कुटुंबीयांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आ.संग्राम जगताप यांनी नुकतीच बुरूडगाव येथे जावून शिंदे कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी शिंदे कुटुंबीयांनी आ.जगताप यांचे औक्षण करून स्वागत केले. तसेच जगताप यांनी स्व. अरूणभाऊ शिंदे यांच्या प्रतिमेस अभिवादनही केले.
यावेळी संजय शिंदे म्हणाले, नगर शहर आणि शिवसेना हे एक घनिष्ठ नातं आहे. परंतु या निवडणुकीत नगरची जागा शिवसेनेला नसल्याने आम्हीं पक्ष आणि राजकारण या पलीकडे कौटुंबिक मैत्री संबंध जपत आ.संग्राम जगताप यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. जगताप आणि शिंदे परिवाराचे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणा पलीकडे कौटुंबिक मैत्री संबंध आहेत. त्यामुळे परिवारातील सदस्य मैदानाच्या रिंगणात उतरल्यानंतर त्याच्या पाठीशी सर्व परिवार उभे राहणे हे आमचे संस्कार आणि कर्त्यव्य आहे. याची जाणीव ठेवून सर्व शिंदे कुटुंबाने एकत्र येत आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीशी जाहीर खंबीरपणे उभे राहून बुरुडगाव प्रभागातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे.
यावेळी भरत शिंदे, दीपक शिंदे,विश्वराज शिंदे, स्वराज शिंदे, अनिल शिंदे, प्रसाद शिंदे, विक्रांत शिंदे, राहुल शिंदे, विश्वजीत शिदे आदींसह महिला उपस्थित होत्या.आ.संग्राम म्हणाले, बुरुडगावच्या शिंदे परीवारने शिवसेने सोबत गेले 45 ते 50 वर्ष प्रामाणिक एकनिष्ठेने काम केले आहे. स्व.अरुणभाऊ शिंदे यांनी राजकारण न करता निस्वार्थपणे सामाजिक कामे करत बुरुडगावच्या विकासाला प्राधान्य दिले. या निवडणुकीत शिंदे परीवार माझ्या सोबत आल्याने मला लढायला आणखीन बळ मिळाले आहे. त्यांनी पाठिंबा दिल्याने मी सदैव त्यांचा ऋणी राहील.