कर्जत जामखेड विधानसभा -समन्वयक म्हणून प्रा भानुदास बेरड यांची नियुक्ती
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर: प्रदेश भारतीय जनता पक्षाने राज्यातील ५५ मतदारसंघात विधानसभा निवडणुक समन्वयक नियुक्त केले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव – पाथर्डी व कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुक समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत.
कर्जत जामखेड विधानसभा निवडणुक समन्वयक म्हणून माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.भानुदास बेरड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघात मी खा प्रितम मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुक समन्वयकांनी पुर्ण वेळ आपआपल्या विधानसभा मतदारसंघात ऊपस्थित राहुन पक्षाच्या प्रचार व व्यवस्थापन, बुथ यंत्रणा क्रियाशील राहील हे पाहणे आहे.