राहुरी विधानसभा मतदारसंघातून पक्षाच्या माध्यमातून 8 उमेदवार तर अपक्ष 5 उमेदवार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
राहुरी ः 223 राहुरी विधानसभा मतदारसंघातून पक्षाच्या माध्यमातून 8 उमेदवार तर अपक्ष 5 उमेदवार असे एकूण 13 उमेदवार 2024 विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वास्तविक या मतदारसंघात लढत ही माजीमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शिवाजीराव भानुदास कर्डिले आणि माजीमंत्री तथा नॅशनॅलिस्ट कॉँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उंमेदवार प्राजक्त प्रसादराव तनपुरे.या दोघा उमेदवारांमध्येच होणार आहे. यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघात दुरंगी लढत होईल.
राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या आखाड्यात शिवाजीराव भानुदास कर्डिले (भारतीय जनता पार्टी), प्राजक्त प्रसादराव तनपुरे (नॅशनॅलिस्ट कॉँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), ज्ञानेश्वर दत्तात्रय गाडे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), अनिल भिकाजी जाधव (वंचित बहुजन आघाडी), जयेश साहेबराव माळी (यलगार पार्टी), प्रदीप प्रभाकर मकासरे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), साहेबराव पाटीलबा म्हसे (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी), सिकंदर बबन इनामदार (आझाद समाज पार्टी, कांशीराम), अरुण भागचंद तनपुरे (अपक्ष), अल्ताफ इब्राहीम शेख (अपक्ष), इम्रान नबी देशमुख (अपक्ष), डॉ. जालींदर घिगे (अपक्ष), दीपक विठ्ठल बर्डेे (अपक्ष) ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.