संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः अहिल्यानगरात सावेडी, पाईपलाईनरोड, मार्केेटयार्ड, भिंगारासह जिल्ह्यात नगर तालुका, कर्जत, श्रीगोेंदा यासह अन्य ठिकाणी ‘ध्येय मल्टिस्टेट’ शाखेमध्ये जास्त परताव्याची आमीष दाखवून तब्बल 112 ठेवीदारांच्या ठेवी घेऊन संबंधितांना एकूण रक्कम 5 कोटी 74 लाख 90 हजार 90 रुपयांना चूना लावला असल्याची घटना अहिल्यानगर तोफखाना पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर समोर आली होती. मोठा गुन्हा असतानाही पोलिसांनी जुजबी कार्यवाही केली. वास्तविक या संसस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन व साईओ यांना तातडीने अटक केली पाहिजे होती. पण संबंधित पोलिस अधिकार्यांनी सर्च रिपोटीर्र्ंग करून ठगांना ताब्यात घेणे आवश्यक होते.
या घटनेनंतर ठेवीदाराने फसवणूक झाल्याप्रकरणी ‘ध्येय मल्टिस्टेट’चे चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे, व्हा.चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे, संचालक व सीईओ राहुल बबन कराळे यांच्या अन्यजणांविरुद्धात तोफखाना पोलिस ठाण्यात दि.16 मे 2024 मध्ये फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन तब्बल 9 महिने होत असतानाही हे सर्व आर्थिक फसवणूक करणारे गुन्हेगार पोलिसांना सापडत का नसाव्यात? यामुळे एकंदरीत पोलिस तपासयंत्रणेवरच सामान्य नागरीक नाराजी व्यक्त करीत आहे.
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात ‘ध्येय मल्टीस्टेट’च्या शाखा सुरु करून ठेवीदारांना ज्यादा परताव्याचे आमिष दाखवत कोट्यावधी रुपयांच्या ठेवी गोळा करून त्या परत न देता सर्व शाखा बंद करून ठेवीदारांची कोट्यावधींची फसवणूक करणारे मुख्य सूत्रधार चेअरमन विशाल भागानगरे, व्हाईस चेअरमन रोहिदास कवडे, संचालक व सीईओ राहुल कराळे हे तिघे 9 महिन्यांचा कालावधी उलटला तरी पोलिसांना सापडलेले नाहीत. आता या गुन्ह्याचा तपास थंडावल्याने ठेवीदार झाले हवालदिल झाले असून पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होवू लागले आहे.
नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी ‘ध्येय मल्टीस्टेट’च्या शाखा सुरु करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून व नंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता सर्व शाखा बंद करून 112 ठेवीदारांचे 5 कोटी 78 लाख 65 हजार रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी ठेवीदार सुजाता संदीप नेवसे (रा. शिंदे मळा, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतसंस्थेच्या चेअरमनसह 7 जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात दि. 16 मे 2024 रोजी फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे (रा. पंचपीर चावडी, माळीवाडा), व्हा. चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहोर रस्ता, सावेडी), संचालक व सीईओ राहुल बबन कराळे (रा. टोकेवाडी ता. नगर), गणेश कारभारी कराळे (रा. आगडगाव ता. नगर), पुजा विलास रावते व विलास नामदेव रावते (दोघे, रा. बोरूडेमळा, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
गन्द्रा दाखल झाल्यापासन गेल्या 9 महिन्यात यातीलपुजा विलास रावते व विलास नामदेव रावत (दघि, रा. बोरूडे मळा, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
गुन्हा दाखल झाल्यापासून गेल्या 9 महिन्यात यातील एकालाही पोलिसांनी अटक केलेली नाही हे न उलगडणारे कोडे आहे. पुढे यातील मुख्य सूत्रधार आणि ज्यांना सह्यांचे अधिकार होते त्या चेअरमन विशाल भागानगरे, व्हाईस चेअरमन रोहिदास कवडे, संचालक व सीईओ राहुल कराळे या तिघांच्या व्यतिरीक्त इतर चौघांनी या घोटाळ्यात आपला संबंध नसल्याचे सर्व पुरावे न्यायालयात सादर केले. त्यामुळे पूजा रावते, विलास रावते, गणेश कराळे यांना न्यायालयाने अटकपूर्व जमीन मंजूर केलेला असून त्यांनी आता गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेले आहेत. त्यावर सुनावण्या सुरु आहेत.
परंतु सर्वसामान्य ठेवीदारांच्या कष्टाचे पैसे ज्यांनी गडप केले त्या तिघा मुख्य सूत्रधारांना पकडण्यात पोलिसांना अद्याप का यश आले नाही? एवढ्या मोठ्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी 9 महिने झाले तरी मोकाट फिरत आहेत, त्यामुळे यामागील गौडबंगाल काय? असा सवाल पाईप लाईन रोड, मार्केट यार्ड, भिंगार, सारोळा कासार, घोगरगाव, मिरजगाव लोणी, भाळवणी या शाखेत ठेवी अडकलेले सर्वसामान्य ठेवीदार करत आहेत.