संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- नगर तालुका पोलिस ठाणे हद्दीमध्ये नेप्ती, वाळकी, साकत, सोनेवाडी, धोंडेवाडी, खांडके या सहा गावांच्या परिसरात सुरु असणारे गावठी हातभट्टीवर नगर तालुका पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईत १ लाख ८८ हजार रुपयांचा गावठी हातभट्टीचा मुद्देमाल जप्त करून ८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .
नगर तालुक्यातील नगर तालुका पोलीसांनी नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार गावठी हातभट्टीची दारूच्या अड्डयावर छापे टाकून उध्वस्त केले. याप्रमाणे सोनेवाडी येथे छापा टाकला. या छाप्यामध्ये १० हजार रू कि. ची.गावठी हातभट्टी ५० लिटरचे दोन प्लसिटीकच्या ड्रममध्ये १०० लिटर तयार दारू आबंट उग्र वासाची जप्त केली. याबाबत पोशि विक्रांत भालसिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं १-२९/२०२२ महाराष्ट्र प्रोव्हिशन अॅक्ट कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला.पंरतु अशोक हिरामण गव्हाणे हा फरार आहे.
सिनानदी पाञात साकत शिवार काटवणामध्ये दोन अवैध दारुअड्यावर छापा टाकून २० हजार रू कि. ची.२ लोखंडी बँरलमध्ये सुमारे ४०० लीटर रसायण प्रतेकी ५० लिटर नायनाट केला. याप्रकरणी पोशि सोमनाथ घावटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आले आहे. येथील आरोपी मच्छिद्र उर्फ रवि लहानू पवार हाही फरार आहे. यासह तालुक्यातील नेप्ती,वाळकी,धोंडेवाडी, खांडके या गावांमध्ये सुरु असणारे गावठी हातभट्टीवर छापे टाकून नगर तालुका पोलीसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.