४८ तासात दरोड्यातील आरोपींची टोळी पकडली ; ‘नगर एलसीबी’ची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगांव : दरोड्यातील आरोपींची टोळी ४८ तासात पकडण्याची मोहीम फत्ते करण्याची कारवाई ‘अ.नगर एलसीबी’ केली आहे. या कारवाईत १ लाख ८५ लाख २०० रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त केला आहे.
अनिल ऊर्फ यासीनखॉ शिवाजी भोसले (वय ४०), रोहन अनिल ऊर्फ यासीनखॉ भोसले (वय १९, दोन्ही रा. गोंडेगांव, ता. शेवगांव), अमर दत्तु पवार (वय ३०), कृष्णा ऊर्फ सागर नारायण भोसले (वय २१ दोन्ही रा. नेवासा फाटा, ता. नेवासा), सुनिल बाबाखॉ भोसले (वय २१, रा. गोंडेगांव, ता. नेवासा) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोउपनि समाधान भाटेवाल व अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, बापुसाहेब फोलाणे, संतोष लोढे, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संदीप दरंदले, फुरकान शेख, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे व संभाजी कोतकर आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
दाखल गुन्ह्याचा दि.१० जून २०२४ नगर एलसीबी टिम’ने गुन्हा घडले ठिकाणी जाऊन पाहणी केली असता घटना ठिकाणी कोठेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आरोपींची काहीएक माहिती मिळून येत नव्हती. त्यामुळे एलसीबी टिम’ने शेवगांव परिसरात फिरुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढत असताना एलसीबी टिम’ला माहिती मिळाली की, अनिल ऊर्फ यासीनखॉ शिवाजी भोसले (रा. गोंडेगांव, ता. नेवासा) याने त्याचे इतर साथीदारांसह गुन्हा केला आहे. तो सध्या त्याचे राहत्या घरी आहे. या माहितीच्या आधारे एलसीबी टिम’ने लागलीच त्या ठिकाणी जाऊन पाहाणी केली. या दरम्यान दोन संशयीत उभे असलेले पोलिसांना दिसले. त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन पोलीसांची ओळख सांगून त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे अनिल ऊर्फ यासीनखॉ शिवाजी भोसले, रोहन अनिल ऊर्फ यासीनखॉ भोसले (दोघे. रा. गोंडेगांव, ता. शेवगांव) असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस करता ताब्यातील संशयीतांनी त्यांचे इतर साथीदार अमर दत्तु पवार, कृष्णा ऊर्फ सागर नारायण भोसले, दिपक इंदर भोसले (सर्व रा. नेवासा फाटा, ता. नेवासा) व सुनिल बाबाखॉ भोसले (रा. गोंडेगांव, ता. नेवासा) यांच्यासोबत मिळून दोन-तीन दिवसांपूर्वी शेवगांव परिसरात व महिन्यापूर्वी चांदगांव उस्थळदुमाला, (ता. नेवासा) परिसरातील मेडिकल दुकान फोडून रोख रक्कम व पल्सर दुचाकी चोरी केल्याचे सांगितल्याने आरोपींचे इतर साथीदारांचा शोध घेता आरोपी अमर दत्तु पवार, कृष्णा ऊर्फ सागर नारायण भोसले, सुनिल बाबाखॉ हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. आरोपी दिपक इंदर भोसले (रा. नेवासा फाटा, ता. नेवासा) हा फरार झाल्याने मिळून आला नाही. आरोपींनी सांगितल्या प्रमाणे जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत.