…२०२१‌ च्या बॅंड पोलिस भरती जागांचा समावेश करा ; एसपी ओला यांच्याकडे युवकांची मागणी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती २०२१ मध्ये बॅंड पोलिस भरती जागांचा समावेश करा, अशी मागणी अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे गणेश केदार,स्वप्नील बडे साई पोटे,गणेश खेडकर, आजिनाथ धायतडक, गोविंद केदार या युवकांनी केली आहे.


महाराष्ट्रात सन-२०२१ नंतर २ ते ३ वर्षांनंतर पहिल्यांदाच खूप मोठी मॅगा पोलीस भरती होत असून या पोलीस भरतीमध्ये बँड शिपाई पदासाठी एकही जागा नसल्यामुळे महाराष्ट्रातील बँड पोलीस भरती तयार करण्याऱ्या सर्व उमेदवार व त्यांच्या पालकांची घोर निराशा झाली आहे. गेल्या २ ते ३ वर्षापासून उमेदवारांनी अविरतपणे बँड पोलीस भरतीचा कसून सराव केला आहे. व येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये बॅंड पोलीस पदासाठी भरपुर जागा निघतील हिच अपेक्षा होती. परंतु या वर्षीच्या १८ हजार ३३९ पदांच्या मॅगा पोलीस भरतीमध्ये बँडसाठी या पदासाठी एकही जागा नसल्याचे पाहून महाराष्ट्रातून या बॅंड पोलीस ची तयारी करणाऱ्या १० ते १२ हजार उमेदवारांच्या पदरी निराशा पडली आहे.
बँड पोलीस भरतीसाठी शिक्षण आणि उंची मध्ये सवलत असल्यामुळे दरवर्षी १० ते १२ हजार मुळे आणि मुली बॅंड पोलीस भरतीसाठी अर्ज करत असतात. गेल्या अनेक वर्षापासून पोलीस भरतीमध्ये दरवर्षी बँड पोलीसासाठी जागा निघत असतात. त्यामुळे दरवर्षी वाद्य वाजविण्याची आवड असणारा वर्ग या पोलीस भरतीची तयारी करीत असतो.परंतु पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पद भरती होऊन सुद्धा बॅंडसाठी एकही जागा नसल्यामुळे उमेदवाराची २ ते ३ वर्षाची मेहनत वाया गेली असल्याची भावना विद्यार्थीमध्ये निर्माण झाली आहे. बॅंड पोलीस भरतीमध्ये मैदानी चाचणी व लेखी परिक्षाबरोबरच वाद्य वाजवण्याचे ही प्रशिक्षण घ्यावे लागते. एवढी सर्व तयारी करुन ही विद्यार्थ्याच्या पदरी निराशा आल्याने गृहविभागाने या भरती प्रक्रियामध्ये काही प्रमाणात का होईना बैंड पोलीस पदाचा समावेश करुन त्याच्या मेहनतीला न्याय मिळवून द्यावे. या पोलिस भरती प्रक्रियेमध्ये आम्हाला बँडन्समन पोलीस च्या जागा देण्यात याव्या. आम्हाला महाराष्ट्र पोलिस भरती सोबत म्हणजे दि.३१नोव्हेबर २०२२ तारखेच्या आत निकाल देण्यात यावा. अर्ज भरण्याची संधी द्यावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!