१२ ऊसतोडणीवाल्यांना २ वर्ष दाबून ठेवले ; संतापजनक घटना
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
संग्राम सत्तेचा
जालना: ऊसतोडणी कालावधी सुरु होताच, मराठवाडा या परिसरातून मोठ्या संख्येने ऊस तोडणी मजूर पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडणी कामासाठी कामगार स्थलांतर होतात. ऊसतोडणी कालावधी संपल्यानंतर सर्व ऊसतोडणी कामगार हे आपल्या जिल्ह्यात परत जातात. हे पोटभरण्यासाठी मराठवाड्यातील ऊसतोडणी कामगारांचे वर्षांनी वर्षे सुरु असतं. पण, या ऊसतोडणी कालावधीतच १२ ऊस तोडणी कामगारांना चक्क २ वर्ष दाबवून ठेवल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. १२ पैकी ३ ऊसतोडणी कामगार काही दिवसांपूर्वी तेथून सुटका करून पळून आले आहेत. त्या पळून आलेल्यांनी या घटनेबाबत आमदार कैलास गोरंट्याल यांना माहिती दिली. आ.
गोरंट्याल यांनी दखल घेतली. याबाबत जालना पोलिसांना माहिती दिली असता,
उर्वरित ९ ऊसतोडणी कामगारांची दोन वर्षानंतर सुटका केली. या संतापजनक घटनेची अधिक तपास सोलापूर पोलिस करीत आहेत.
ऊसतोडणीस गेल्यानंतर अडकून पडलेल्या मजुरांची जालना पोलिसांनी केली सुटका केली. त्यापूर्वी सोलापुर जिल्ह्यातील बाधलेवाडी येथून तीन ऊस तोडणी मजुरांनी येथुन पळ काढल्यानं हा प्रकार उघडकीस आला. जालना पोलिसांनी मजुरांची दोन वर्षांनी सुटका करण्यात यश मिळवलं.
शेतीच्या कामाल लावलं
ऊस तोडणीचे काम संपल्यानंतर या बारा मजुरांना एका शेतात दोन वर्षे बंधक करून शेतीचे काम करून घेण्यात येत होते. या मधील त्या ठिकाणी असलेली एक महिला, तिची आई आणि नऊ वर्षाचा मुलगा तेथून पळून जालन्यात आले. आणि हा सर्व प्रकार जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांना सांगितला.
आमदार कैलास गोरंटयाल यांचे प्रयत्न
सोलापूरमधून पळून आलेल्या ऊस तोडणी मजुरांनी आमदार कैलास गोरंटयाल यांची भेट त्यांच्याबाबत घडलेला प्रकार सांगतिला. यानंतर आमदार कैलास गोरंट्याल यांनी हा प्रकार जालना पोलिसांना सांगितला. जालना पोलिसांनी पथक पाठवून या सर्व मजुरांची सुटका केली. यानंतर त्या मजुरांना जालन्यात आणण्यात आले. सध्या या प्रकरणाचा तपास जालना पोलिसांनी सोलापूर पोलिसांकडे वर्ग केला आहे