संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – अहमदनगरमध्ये १० रुपयांची नाणी न घेणा-या दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी गौसे आजम सेवाभावी संस्थाचे मुख़्तार सय्यद व सुल्तान शेख यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अहमदनगर शहर व जिल्हयात १० रुपयाचे नाणे स्विकारण्यास मनाई करत असल्याने संबंधित व्यापा-यांवर तसेच बँकांवर कायदेशीर कारवाई व्हावी. अहमदनगर शहर, जिल्ह्यात १० रुपयांचे नाणे व्यापारी वर्ग स्विकारीत नसल्याचा प्रकार चालू आहे. जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील अनेक नागरिक कामानिमित्ताने या शहरांमध्ये येतात. परंतु त्यांच्याकडून १० रुपयांचे नाणे व्यापारी स्विकारीत नसल्याने ग्राहकांची फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. या व्यापा-यांकडे याची विचारणा केली असता ते सांगतात की, बँकेत १० रुपयाचे नाणे आमचेकडून स्विकारत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्याकडून १० रुपयांचे नाणे घेणार नाही अशा प्रकारे ग्राहकांची मोठी अडवणूक केली जात आहे.
वास्तविक पाहता १० रुपयांचे नाणे हे रिझई बँकेने वितरित केलेले आहे. ते भारतीय चलन असून या चलनाचा अवमान हे व्यापारी तसेच बँका करीत आहेत. १० रुपयांचे नाणे हे भारतीय अर्थव्यवस्थेत नियमित चालणारे चलन आहे. हे चलन भारतीय बाजारपेठेत चालू असतांना मात्र नगर शहर व जिल्हयातील काही शहरातील व्यापारी व बँका १० रु.चे चलन स्विकारण्यास स्पष्ट शब्दात नकार देत आहेत. आपण नगर शहर व जिल्हयातील ज्या ज्या शहरात १० रु. चे नाणे स्विकारण्यास नकार देवून ग्राहकांची अडवणूक केली जाते, अश्या सर्व व्यापारी तसेच बँकांची सखोल चौकशी करून त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई सर्व व्यापारी व बँकांना १० रु. चे नाणे स्विकारण्याबाबत सक्ती करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.