👉१०वी, १२वी परीक्षा कॉपीसाठी मदत करणाऱ्या पर्यवेक्षक आणि संबंधित यंत्रणेवर कारवाई होणार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (ssc, hsc exam )
अहमदनगर – १०वी, १२वी सर्व परीक्षा केंद्रांवर बैठे पथक नेमण्यात येणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील एकूण १६ संवेदनशील केंद्र जाहीर करण्यात आली आहेत. या संवेदनशील केंद्रांवर पूर्ण वेळ व्हिडिओ शूटिंग केली जाणार आहे. १० वी, १२ वीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात, यासाठी शिक्षण विभागासह प्रशासन कार्यरत आहे. काही दिवसात होऊ घातलेल्या १२ वी आणि १० वीच्या परीक्षेमध्ये कॉपीसाठी पूरक काम करणाऱ्या शिक्षक आणि परिवेक्षेयकीय यंत्रणेवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सांगितले.
राज्यात कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्यात, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्यात यासाठी महसूल, जिल्हा परिषद आणि पोलीस यंत्रणा एकत्रितपणे काम करणार आहे. जिल्ह्यातील कॉपीचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना केले आहेत.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राजेश ओला, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये इयत्ता १२ वीचे १०८ केंद्र असून या परीक्षा केंद्रावर ६३ हजार ३१३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत तर जिल्ह्यामध्ये दहावीचे १७९ केंद्र असून या केंद्रांवर ६९ हजार ५३४ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. या सर्व केंद्रांवर पोलिसांची नजर असणार असून मात्र पोलिसांना परीक्षेच्या दालनामध्ये प्रवेश असणार नाही. महसूल पोलीस आणि जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे. कॉपीमुक्तीच्या नांदेड पॅटर्नच्या धरतीवर अहमदनगर जिल्ह्यात यंत्रणा राबवण्यात येणार आहे. यायासाठी जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय सहा भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच तालुकास्तरावर तहसीलदार ग्रामविकास अधिकारी आणि पोलीस यंत्रणा यांचे भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच तालुकास्तरावर तहसीलदार ग्रामविकास अधिकारी आणि पोलीस यंत्रणा यांचे भरारी पथक तयार करण्यात आली आहेत.
जिल्हास्तरीय सहा भरारी पथकामध्ये जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखालील पथक त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या मार्गदर्शनाखालील पथक शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या मार्गदर्शनाखालील पथक शिक्षणाधिकारी योजना यांचे पथक शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे पथक आणि जिल्हा शिक्षण संस्था म्हणजेच डायट यांचे एक पथक असे मिळून सहा पथके असणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून दहा मीटर परिसरात झेरॉक्स आणि फॅक्स यांची केंद्रे बंद असणार आहेत.परीक्षापूर्वी परीक्षार्थी दालनात प्रवेश करण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाणार आहे.
त्यानंतरच त्याला दालनामध्ये प्रवेश दिला जाणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर पोलिसांची नजर असणार असून मात्र पोलिसांना परीक्षेच्या दालनामध्ये प्रवेश असणार नाही.
बोर्डाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच सकाळी साडेदहा वाजता आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित अनिवार्य असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी सांगितले.