हापमॅर्डर गुन्ह्यात फरारी तलवार, चॉपरसह अटक ; तोफखाना पोलिसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : नगर शहरातील तोफखाना हद्दीत भा.दं.वि.क ३०७ गुन्ह्यातील फरारी पकडण्यात आलेल्या आरोपीकडून तलवार, चॉपर जप्त करण्याची कारवाई करुन बेड्या ठोकण्याची कारवाई तोफखाना पोलिसांनी केली आहे. उत्कर्ष सुनिल गाडे (वय २७, रा. शिवनगर, घर नं.२५, भगवान बाबा चौक, ता.जि अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोनि आनंद कोकरे यांच्या सूचनेनुसार तोफखान्याचे पोउपनि शैलेश पाटील, पोहेकॉ दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाठ, अहमद इनामदार, दिनेश मोरे, भानुदास खेडकर, पो.ना संदिप धामणे, वसिम पठाण, पो.कॉ सुमित गवळी, सतिष त्रिभुवन, शिरिष तरटे, दत्तात्रय कोतकर, सतिष भवर, बाळासाहेब भापसे आदींच्या टिमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.११ जून २०२४ रोजी रात्री ८.५० वाजण्याच्या सुमारास पोनि आनंद कोकरे यांना मिळालेल्या माहितीनुसार तोफखाना गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तपोवन रोड, युनिटी ग्राऊंड या ठिकाणी जाऊन सापळा लावून संबंधित पळण्याच्या तयारीत असताना अचानक छापा टाकून त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सांगितले. त्याची व पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ हजार ५०० रु किं.ची २३ इंच लांबीची लोखंड पात्ते व समोर निमुळती त्या पकडण्यासाठी मुठ असलेली तलवार व ५०० रु किं.चा ५ इंच लांब पात्ते व वरच्या बाजुला दात-या असलेला चॉपर त्यास इंच लांब हिरव्या रंगाची मुठ असलेली जप्त करण्यात आली, त्याबाबत पो.काॅ सतिष भन यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात गुरनं ७२५/२०२४ आर्म ॲक्ट कायदा कलम ४/२५ सह म.पो.का.क ३७(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी उत्कर्ष सुनिल गाडे हा पो.स्टे गुन्हा रजि नं. ९४२/२०२४ भा.दं.वि ३०७ सह आर्म ॲक्ट ५/२५ मध्ये फरार असल्याचे अभिलेखावर आढळून आल्याने त्यास गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आली. पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहे.