संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online news Natwork
अहमदनगर : नगर तालुक्यातील वाळकी येथील खुनाच्या व खंडणीच्या गुन्ह्यातील मागील तीन महिन्यापासून फरार असणारा आरोपी विश्वजीत कासार याचा हस्तक अशोक उर्फ सोनू गुंड याला पकडण्यात नगर तालुका पोलीसांना यश आले आहे. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयाने ४ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार पोउनि पोउनि युवराज चव्हाण, पोहेकॉ सुभाष थोरात, पोकॉ कमलेश पाथरुट, संभाजी बोराडे, राजू खेडकर, विक्रांत भालसिंग यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे गार्भीय लक्ष्यात घेऊन एसपी राकेश ओला यांनी तात्काळ गुन्ह्यातील आरोपी यास ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या होत्या.
या गुन्ह्यातील आरोपी इद्रजीत रमेश कासार व शुभम उर्फ भोले जर्नाधन भालसिंग यास यापूर्वीच ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे. गुन्ह्यातील विश्वजीत रमेश कासार याचा हस्तक सराईत आरोपी अशोक उर्फ सोनू गुंड (रा. वाळकी) हा मागील तीन महिन्यापासून फरार होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांनी पथक तयार करुन आरोपीस ताब्यात घेण्यासंदर्भात सूचना दिल्या. पथक आरोपीचा शोध घेत असतांना सपोनि श्री देशमुख यांना माहिती मिळाली, गुन्ह्यातील फरार आरोपी अशोक उर्फ सोनू गुंड हा पुणे येथून केडगाव परिसरामध्ये येणार आहे. तुम्ही केडगाव परिसरामध्य जाऊन सापळा लावून थांबा असा आदेश दिला. पथक हे केडगाव परिसरामध्ये जावून सापळा लावून थांबले असता काही वेळामध्ये आरोपी हा केडगाव परिसरामध्ये संशयीतपणे तोंडाला रुमाल बांधून येताना दिसला. पथकाची खात्री होताच, त्यास ताब्यता घेतले. त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्यास न्यायालयामध्ये हजर केले असता आरोपी गुंड याला न्यायालयाने ४ दिवस पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास सपोनि शिशिरकुमार देशमुख हे करीत आहेत.
आरोपी हा मुख्य मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी विश्वजीत कासार (रा. वाळकी) याचा मुख्य हस्तक आहे. त्याच्यावर यापूर्वी देखील मुख्य आरोपीकरीता खंडणी मागणे, मारहाण करणे अशा प्रकारचे खालील गुन्हा दाखल आहेत.