संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मॉस्को – जगभरात अशांततेचे वातावरण निर्माण करणारे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आश्चर्यकारक रशियन मिडियाला आदेश दिले आहेत. हे आदेश रशियन सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या मीडिया रेग्युलेटरी डिव्हिजनने शनिवारी आदेश काढले आहेत.
यात असे म्हटले की, कोणत्याही मीडिया हाऊसने या सध्याच्या परिस्थितीत युद्ध, हल्ला अथवा घुसखोरी असा शब्द प्रयोग करू नयेत. या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित पत्रकारांना शिक्षा होऊ शकते, तसेच मीडिया हाऊस बंद करून, त्यासंबंधीस मोठा दंडही केला जाणार आहे.
खरे तर पुतीन यांनी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच माध्यमांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली. या अंतर्गत सूचना जारी केल्या जात होत्या. आता युद्ध सुरू झाले असून रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. पुतिन यांची समस्या अशी आहे की, अनेक लोक उघडपणे त्यांच्या लहरीपणाला आणि देशातल्या लढाऊ आवेशांना विरोध करत आहेत. त्यामुळेच ते आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. मेनस्ट्रीम मीडिया पुतिन यांच्या विरोधकांना भरपूर कव्हरेज देत आहे.
‘मॉस्को टाईम्स’च्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टनुसार – रशियन सरकारला वाटू लागले आहे की आपल्या पावलांना घरातून विरोध होत आहे. त्यामुळे आता या आवाजांना चिरडण्याची तयारी सुरू झाली आहे. मीडिया नियामकाने हा आदेश रशियन भाषेत जारी केला आहे.
या अंतर्गत मीडिया रिपोर्टिंगमध्ये हल्ला, युद्ध अथवा घुसखोरी या शब्दांचा वापर केला जाणार नाही. उल्लंघन केल्यास शिक्षा, मीडिया ब्लॉकिंग आणि दंड आकारला जाईल. आदेशात म्हटले आहे- काही स्वतंत्र मीडिया हाऊस चुकीच्या बातम्या देत आहेत. रशियन सैन्याने युक्रेनमधील शहरांवर हल्ले केल्याचा दावा ते करत आहेत.
पुतीन यांच्या आदेशानुसार देशाची सायबर सुरक्षा एजन्सी सोशल मीडिया खात्यांवरही नजर ठेवत असल्याचे पूष्टी न झालेल्या वृत्तांत म्हटले आहे. विशेषत: पुतिन यांना विरोध करणाऱ्या खात्यांवर लक्ष ठेवले जात आहे. जे लोक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नाहीत त्यांना 60 हजार रूबलचा दंडही होणार आहे.
मीडिया हाऊसना फक्त तीच माहिती देण्यास सांगण्यात आले आहे जी सरकार जारी करत आहे. हे पाऊल उचलण्याचे एक कारण म्हणजे काही प्रसारमाध्यमांनी असा दावा केला आहे की युक्रेनियन सैन्याने रशियाचे खूप मोठे नुकसान केले आहे आणि रशियन सैनिक सतत मारले जात आहेत.