संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : हज करणे हे अत्यंत सोपे आहे, मात्र आपण नवीन असल्याने घाबरून न जाता मौलाना व कारी यांच्याकडून माहिती घेऊन व तरबियती कॅम्पमध्ये (मार्गदर्शन शिबिर) भाग घेऊन माहिती घेतल्यास हज यात्रा करताना कुठलीही अडचण येत नाही, असे पुण्याचे कारी अब्दुल्ला यांनी सांगितले. यावर्षी तंबोली टूर्समार्फत 250 हज यात्रेकरू हजला जात आहेत.
येथील प्रसिद्ध व गेल्या 38 वर्षांपासून हज यात्रेकरूंची सेवा करणार्या तंबोली हज-उमरा टूर्सतर्फे घेण्यात आलेल्या तरबियती कॅम्प (मार्गदर्शन शिबिर)मध्ये मार्गदर्शन करताना कारी अब्दुल्ला माहिती देत होते. या तरबियती कॅम्पमध्ये माहिती घेण्यासाठी यावर्षी हजला जाणारे इतरही काही यात्रेकरू सहभागी झाले होते.
कारी अब्दुल्ला म्हणाले, अरफात येथे गेल्यावर शैतानाला किती कंकर मारावेत, त्यावेळी कोणती काळजी घ्यावी. काबेचे चक्कर मारताना ते कधी व कोणत्यावेळी मारावेत, ज्येष्ठ नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, आधी संबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ईदच्या दिवशी कुरबानी करताना व ऐहराम बांधल्यावर कोणती काळजी घ्यावी, कोणत्या ठिकाणी नमाज कशी अदा करावी, काय प्रार्थना करावी, याचीही माहिती दिली. त्याचबरोबर तेथे गेल्यावर टूर्सच्यावतीने पुन्हा एकदा अरकानची माहिती कारी व हाफीज साहब यांच्याकडूनही दिली जाते.
हजला जाताना ऐहराम कुठून बांधावे, ते बांधल्यावर कोणती काळजी घ्यावी, ते कोठे काढावे तसेच विमानातून मक्का येथे उतरल्यावर कोणते अरकान (विधी) करावे, मदीना येथे राहून काय करावे. अरफात, मुजलफा व इतर ठिकाणी जाताना कोणती प्रार्थना करावी तसेच खाणे काबा येथे गेल्यावर प्रथम कोणती प्रार्थना करावी. यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी टूरचे संचालक हाजी शौकतभाई तंबोली, हाजी आलम तंबोली, हाजी शोहेब तंबोली, हाजी अजीम तंबोली, हाजी अब्दुल्ला तंबोली, हाजी ओसामा तंबोली तसेच शेख शाकीर यांनी परिश्रम घेतले.
संकलन: सरवर तांबटकर