संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- तालुक्यातील चिंचपुर पांगुळ येथे शनिवार ( दि.25) स्व. मा.आ .दगडू पाटील बडे क्रिकेट चषक स्पर्धेस प्रारंभ झाला. यावेळी क्रिकेट स्पर्धेचे ग्रामपंचयतचे ज्येष्ठ सदस्य विष्णू खाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच धनंजय बडे , मा.प.स. सदस्य डॉ.राजेंद्र खेडकर व ग्रा.प.स.विष्णू शंकर खाडे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
युवानेते धनंजय बडे म्हणाले की, तरुणांनी मैदानी खेळास प्राधान्य द्यावे. त्यामुळे शरीर निरोगी ,सुदृढ राहते. तसेच डॉ.खेडकर यांनी मार्गदर्शनपर भाषण केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र बँकेचे नागेश शिरसाठ होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्यध्यापक प्रा.संजय घिगे यांच्यासह ,तुकाराम बडे, विक्रम साखरे, लालाजी बडे, बाबुराव गीते, दगडू बडे , सोनाजी बडे, संजय बारगजे, सोमनाथ बडे, एस.के.बडे, विकास बडे,गणेश बडे, केशव बडे, बाबू अबिलढगे, रामनाथ बडे, ईश्वर पालवे, वैभव बडे, अमोल साळुंके, कल्याण रंधवे, बाळासाहेब अंबिलढगे, वासुदेव बडे, अर्जुन बडे , सुदर्शन बडे आदींसह वडगांव,जोगेवाडी,ढाकणवाडी येथील नागरिक तसेच क्रिकेट क्लब चे खेळाडू ,क्रिकेटप्रेमी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेसाठी प्रथम ३१ हजार रूपये , द्वितीय २१ हजार रुपये व तृतीय ११ हजार रुपये पारितोषिक आहे तर उत्तेजनार्थ अनेक रोख स्वरूपातील बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
स्व .आ.दगडू पाटील बडे चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन माजी आमदार स्व. दगडू पाटील बडे (दादा) प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सोमराज बडे यांनी केले. स्वागत प्रकाश बडे यांनी केले. आभार प्रदर्शन शत्रुघ्न बडे यांनी मानले.
स्पर्धेसाठी ९९९ असे प्रवेश शुल्क ठेवले आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त क्रिकेट संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.